विधानसभा-२०१४

Submitted by हतोडावाला on 25 September, 2014 - 04:57

पितृपक्ष संपले व अर्ज दाखल व्हायला लागेल तरी सुद्धा अजून सेना-भाजप आणि काँग्रेस-रा. काँग्रेस जागा वाटपा वरुन रस्सीखेच करताना दिसत आहेत. आघाडी सोडून बाकी सर्वाना आपल्या अगाध शक्तीचा साक्षात्कार झाला असून मुख्यमंत्र्याची स्वप्ने पडू लागली आहेत. उधोजीराजे तर चक्क राज्यभिषेकाची तयारी करुनच बसलेत असा एकूण थाट दिसतो. भाजपनी पहिल्यांदाच सर्व शक्ती पणाला लावली असून लहान्भाऊ- मोठाभाऊ वाला प्रश्न एकदाचा निकाली काढायचे ठरवले दिसते. जानकरानी तर काल चक्क मीच महायूतीचा मालक असून सेना किंवा भाजपनी ठरवावे की त्याना आमच्या सोबत यायचे की स्वतंत्र लढायचे अशी दचकविणारी प्रतिक्रिया हाणली. राजू शेट्टीनी शेतक-यांचा कर्ता धर्ता काय तो मीच आहे म्हणून स्वतःचं ब्रँडीग सुरु केलय. रामदास आठवलेनी खुल्लम खुल्ला आव्हान दिलं की " मै नही तो तुम नही" ज्यांच्या सोबत रिपब्लीकन तोच पक्ष सत्तेत येणार इ. स्वरुपाची एक शीघ्र कविता वाचून स्वतःच हासून घेतले. महायुतीमधे जागा वाटपा वरुन हा सगळा घोळ सुरु असताना ईकडे काँग्रेसनी आज ११७ जागांची यादी जाहीर करुन टाकली. त्यामुळे आधीपासून आघाडीच्या विरोधात असलेल्या अजित दादानी राष्ट्रवादी आता संपूर्ण २८८ जागा लढवेल अशी हाक देत कार्यकर्त्याना सज्ज राहण्याचा ईशार (की हुकूम) दिला. मुख्यमंत्री बाबानी तर चक्क कराडला मुक्काम ठोकला असून त्यानी प्रचारही सुरु केला आहे.
या सर्व तंगडखीच घडामोडीमध्ये एक व्यक्ती अत्यंत शांततेने व संयमाने वागताना दिसत आहे ती म्हणजे शरद पवार. पवार काय गेम खेळतील ते शेवट पर्यंत समज नसते. कधी कधी ते कधीच समजत नसते. यावेळी ते नेमकं कोणता गेम खेळतात ते पहायचे आहे.

यांच्या वागण्यामुळे एक मतदार म्हणून मला प्रचंड नैराश्य आले आहे. तरी मी नेटाने जाऊन मतदान करणारच आहे. पण ही कुस्ती आतातरी थांबावी वाटते.

काँग्रेस राष्ट्रवादीनी घरी बसावे हे काल पर्यंत वाटत होते पण महायुतीची आठवड्या भरातली दिव्य वागणूक पाहता चित्र फार आशादायी वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युतीत छोटे पक्ष बदनाम होतात. काल राजू शेट्टींनी एबीपी माझा वर खूलासेवार सांगितलं सर्व.

या जागांवर आमच्या पक्षांची लढण्याची तयारी आहे यातल्याच आम्हाला काहि सोडा म्हणून त्यांनी एक यादी दिली होती. या सर्व जागा आम्हाला पाहीजेत असं त्यांचं म्हणणं नव्हतं. ११ जागा तर स्व्हाभिमानी पक्ष युती किंवा आघाडी नसताना जिंकू शकतो. पूर्वी देखील राजू शेट्टी स्वबळावर निवडून आले आहेत. तर सदाभाऊ खोत थोड्या मतांनी पडले. सुधाकर परीचारक त्यांच्याबरोबर येणार आहेत. त्यांचा प्रभाव आहे.

जानकर लोकसभेला फार थोड्या मतांनी पडले. मोदींनी पवारांच्या विनंतीवरून बारामतीतली सभा टाळली असा गौप्यस्फोट त्यांनी केला. जो मतदारसंघात आधीच माहीत होता. जानकरांच्या मागे धनगर समाजाची संघटना आहे. पूर्वी मुंडेंच्या करीष्माई नेतृत्वामुळे हा समाज भाजपला मतं देत होता. या समाजाची मते १० ते २० टक्के आहेत. काही ठिकाणी निवडून येऊ शकण्याइतपत तर काही ठिकाणी टक्कर देण्याइतपत.

रामदास आठवलेंची झाकली मुठ सव्वालाखाची आहे. साडेबारा टक्के समाजापैकी नेमकी किती आहे हे समजत नाही. त्यांच्यावर रागात असणारे अनेक आहेत मात्र जेव्हां अन्याय होतो तेव्हां सर्वात पहिले धावून जानारे ही प्रतिमा जपल्याने महाराष्ट्रात ब-याच जागांवर किमात दोन टक्के मतं ते ट्रान्सफर करू शकत असावेत. तर मुंबई, पुणे आणि अन्य पॉकेट्समधे लक्षणीय मतांची बँक त्यांच्याकडे आहे.

युती आणि आघाडीच्या पारंपारीक मतांमधे ३ टक्क्याचा फरक आहे. मनसे नेहमीप्रमाणे युतीला खिंडार पाडू शकते. या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांची गरज नसेल तर आधीच सांगायचं स्पष्ट. पण जागावाटपाचं गु-हाळ लावून मित्रपक्षांना ऐनवेळी उम्देवार उभे करता येऊ नयेत अशी चाल ते पण जाणून आहेत. तेव्हां त्यांनी केलेल्या वक्तव्यांना त्याच संदर्भात पहावे.

अन हो आज पंकजा मुंडेनी अर्ज भरला म्हणे.
भाजपच्या पत्राशिवाय असा कसा अर्ज भरला? तेही अजून जागांचे भांडण संपले नसताना!

मनसे तर संपल्यात जमा आहे. पण पवार एवढे शांत का ते कळत नाही!

पवार-मोदी-राज ठाकरे अशी छूपी युती/समझौता असावा असे वाटते.