इत्यर्थ : मात्रावृत्त आनंदकंद

इत्यर्थ : मात्रावृत्त आनंदकंद

Submitted by भारती.. on 17 June, 2014 - 11:26

इत्यर्थ

माझ्या घरी जरी ही माझी न ही कुणीही
मीही न आप्त यांची दु:खे किती अशीही

डोळ्यात थांबलेले .. शपथेत बांधलेले
अंधार आसवांचे ओसंडती तरीही

घेऊन जा सवे तू स्वप्ने उदासलेली
मागे नकोस ठेवू निजखूण कोणतीही

श्वासात गुंफलेला जो शब्द-शब्द होता
मौनात लोपवू तो? राहेन शेष मीही ?

त्रासास नाव दुसरे आयुष्य जाणले की
मग त्रास जीवघेणा होईल का कधीही

साधाच भारती हा व्यवहार जीवनाचा
तू शोधशी कशाला इत्यर्थ आणखीही !

- भारती बिर्जे डिग्गीकर

Subscribe to RSS - इत्यर्थ : मात्रावृत्त आनंदकंद