Submitted by भारती.. on 17 June, 2014 - 11:26
इत्यर्थ
माझ्या घरी जरी ही माझी न ही कुणीही
मीही न आप्त यांची दु:खे किती अशीही
डोळ्यात थांबलेले .. शपथेत बांधलेले
अंधार आसवांचे ओसंडती तरीही
घेऊन जा सवे तू स्वप्ने उदासलेली
मागे नकोस ठेवू निजखूण कोणतीही
श्वासात गुंफलेला जो शब्द-शब्द होता
मौनात लोपवू तो? राहेन शेष मीही ?
त्रासास नाव दुसरे आयुष्य जाणले की
मग त्रास जीवघेणा होईल का कधीही
साधाच भारती हा व्यवहार जीवनाचा
तू शोधशी कशाला इत्यर्थ आणखीही !
- भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा छान अधीच्या रचनेपेक्षा
वा छान अधीच्या रचनेपेक्षा नक्कीच कमी आक्षेप येतील किंवा सौम्य असतील असे वाटते
असो
मला सर्व शेर आवडले (भावना व्यक्त करताना तुम्हाला अगदी नेमके नेटके शब्द सुचतात . मला वाटतं गझलकाराला हे जमायलाच हवं असं काहीतेरी आहे जे तुम्हाला अगदी जन्मजात काही मिळावं तसं मिळालय )
काही शेरात काफिया आधी योजूनही शेर काफियानुसारी न वाटणे ह्यात नक्कीच शायराचे श्रेय मानावे शाबासकी द्यावी असे काही
(हुर्रे माझा प्रतिसाद सर्वात आधी !!! )
धन्यवाद वैवकु, तुम्ही उगीच
धन्यवाद वैवकु, तुम्ही उगीच काहीही लिहिणार नाही. तुमचा प्रतिसाद सगळ्यात आधी आहे पण तो अजून तरी शेवटचाच आहे
आधीची गझल माझी अत्यंत आवडती होती , हिचं रुपरंग अगदी वेगळं उतरलं आहे.
व्यक्त होण्याचा आनंद कुठेही सारखाच.
समहाउ, एका कवितेसारखा आस्वाद
समहाउ,
एका कवितेसारखा आस्वाद घेतला मी.
कल्पना.. त्या व्यक्त करण्यासाठी केलेली चपखल शब्दनिवड यांमुळे तुमचे कोणतेही साहित्य कायमच वाचनीय असते भारतीताई.
तुम्ही मायबोलीवर आहात हे आमचे भाग्य आहे.
छान गझल झाली आहे. आवडली.
छान गझल झाली आहे. आवडली.
आभार चैतन्य, बेफिकीर , या
आभार चैतन्य, बेफिकीर , या 'कवितामय' गझलेचा आस्वाद घेण्यासाठी.
मात्रावृत्त आनंदकंदचा हा मागोवा होता
आवडली
आवडली
I suspect you have tried to
I suspect you have tried to be someone different than what you are.
मला विशेष आवडली नाही.
हिचं रूपरंग वेगळं उतरलं आहे
हिचं रूपरंग वेगळं उतरलं आहे असं मी म्हटलंच होतं रणजीत, मला ही प्रतिक्रियाही अपेक्षित होती.एखाद्या फोटोत आपण आपण वाटत नाही , तसं..:)
शेवटचे दोन शेर समजले आणि ते
शेवटचे दोन शेर समजले आणि ते अर्थपूर्ण आहेत. पण बाकीचे समजले नाहीत..
एखाद्या फोटोत आपण आपण वाटत नाही , तसं..>>> खरंय
चांगली गझल.
चांगली गझल.
त्रासास नाव दुसरे आयुष्य
त्रासास नाव दुसरे आयुष्य जाणले की
मग त्रास जीवघेणा होईल का कधीही
व्वा !
भारतीताई , मला या क्षणी असं वाटतंय की तुमची या आधीची गझल तुमच्या व्यक्त करण्याच्या नैसर्गिक शैलीच्या अधिक जवळ होती .
असो .
इतरही शेर छानच .
एखाद्या फोटोत आपण आपण वाटत
एखाद्या फोटोत आपण आपण वाटत नाही , तसं.. >>
'फोटो'वरुन निदा फाजलींच्या ओळी आठवल्या. तसा अर्थाअर्थी इथे काहीही संबंध नाहीये, तरी....
बाँट के अपना चेहरा, माथा, आँखें जाने कहाँ गई,
फटे पुराने इक अलबम में चंचल लड़की जैसी माँ
आवडली........
आवडली........