भावना चिमटे
Submitted by Babaji on 23 June, 2014 - 04:13
मान्य आहे नियमांचे
महत्वही थोर
नको वाटते फुकाचे
आग्रही अघोर
माणुस वा माणूस हा
पेटतोय वाद
हरवते माणुसकी
नाही कुणा याद
शुद्धतेच्या आग्रहात
शुद्ध भाव कुठे
दीर्घ लघु आकारांत
भावना चिमटे
खेळ खेळलो जरासा
उघड गुपीत
अजूनही चाले कुणी
आंधळ्या चालीत
- दुकानजी
विषय:
शब्दखुणा: