भावना चिमटे

Submitted by Babaji on 23 June, 2014 - 04:13

मान्य आहे नियमांचे
महत्वही थोर
नको वाटते फुकाचे
आग्रही अघोर

माणुस वा माणूस हा
पेटतोय वाद
हरवते माणुसकी
नाही कुणा याद

शुद्धतेच्या आग्रहात
शुद्ध भाव कुठे
दीर्घ लघु आकारांत
भावना चिमटे

खेळ खेळलो जरासा
उघड गुपीत
अजूनही चाले कुणी
आंधळ्या चालीत

- दुकानजी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुकानराव (एकदाचं) जमलं बरका!!
रच्याकने, 'भावना चिमटे' हे मुलीचं नाव वाटलं आणि प्रेम कविता असावी असा (गैर)समज झाला.

आब्भार !
टोच्याशेट, सान्गतो.

मि आधिच सान्गितल होत कि फाश्त दाबल्य कि अक्शर निट उठत नाहि. जरा टाइम घेवुन हळुहळु कि दाबल्या मग सगलम बरोबर आलम .

मि आधिच सान्गितल होत कि फाश्त दाबल्य कि अक्शर निट उठत नाहि. जरा टाइम घेवुन हळुहळु कि दाबल्या मग सगलम बरोबर आलम .<<< वेल डन.
कृपया सगळीकडे असेच लिहा हो.