झटपट मश्रूम

झटपट मश्रूम

Submitted by शबाना on 26 March, 2014 - 10:26

कोकोनट पावडर घालून

साहित्य

२५० ग्रम मश्रूम - nutty किंवा साधे पांढरे

लाल तिखट, हिंग, हळद, मीठ आणि कोकोनट पावडर तीन चमचे - म्यागी किंवा इतर ब्रांड आणि कोथिंबीर.
झटपट असल्यामुळे बाकी मसाले लसुन किंवा ओले खोबरे नाही घातले., पण वेळ असेल तर घालू शकता.

वेळ - दहा मिनिटे

कृती

तेल गरम करून कडीपत्ता, हिंग आणि हळद फोडणीला टाकायची. यावर कापलेले मश्रूम टाकून झाकण ठेवून एक वाफ आली की लाल तिखट आणि कोकोनट पावडर घालून परत वाफवायचे. मश्रूमला पाणी सुटतेच त्यामुळे पाणी घालू नका. ५-७ मिनिटात कोथिम्बिर घालून थोडे हलवले कीरस्सादार मश्रूम तयार. पोळी किंवा भातावर वाढून छान लागते

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - झटपट मश्रूम