Submitted by शबाना on 26 March, 2014 - 10:26
कोकोनट पावडर घालून
साहित्य
२५० ग्रम मश्रूम - nutty किंवा साधे पांढरे
लाल तिखट, हिंग, हळद, मीठ आणि कोकोनट पावडर तीन चमचे - म्यागी किंवा इतर ब्रांड आणि कोथिंबीर.
झटपट असल्यामुळे बाकी मसाले लसुन किंवा ओले खोबरे नाही घातले., पण वेळ असेल तर घालू शकता.
वेळ - दहा मिनिटे
कृती
तेल गरम करून कडीपत्ता, हिंग आणि हळद फोडणीला टाकायची. यावर कापलेले मश्रूम टाकून झाकण ठेवून एक वाफ आली की लाल तिखट आणि कोकोनट पावडर घालून परत वाफवायचे. मश्रूमला पाणी सुटतेच त्यामुळे पाणी घालू नका. ५-७ मिनिटात कोथिम्बिर घालून थोडे हलवले कीरस्सादार मश्रूम तयार. पोळी किंवा भातावर वाढून छान लागते
महत्वाच्या टीपा
* झटपट असल्यामुळे फोटो बीटो काढले नाहीत.
* पाक कला सदरात दिलंय खरं पण कला बिल काही नसून उदरभरण हेतू जुगाडातून जन्मलेला हा प्रकार आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मश्रुम माझे जाम
मश्रुम माझे जाम आवडते.:स्मित:
बर्याच दिवसात केले नाहीत. आता करणार. झटपट कृती आहे. शबाना, कृती झटपट असल्याने नारळाचे दूध ( पॅक ) पण वापरु शकतो की.
मश्रुम आवडतातच तेव्हा हे करून
मश्रुम आवडतातच तेव्हा हे करून बघेन.
तुम्ही कृती लिहीतांना "नवीन पाककृती" हा पर्याय वापरलेला दिसत नाही.