रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल ?
सैन्यात न जाता रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल ? रणगाडा चालवण्याचा परवाना कसा काढतात व त्यासाठी कुठे जावे लागते ?
कृपया थोडक्यात माहिती द्यावी ही नम्र विनंती.
सैन्यात न जाता रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल ? रणगाडा चालवण्याचा परवाना कसा काढतात व त्यासाठी कुठे जावे लागते ?
कृपया थोडक्यात माहिती द्यावी ही नम्र विनंती.
मागच्या वर्षी मी माझ्या १ वर्षाच्या मुलीसाठी घरीच हलव्याचे दागिने तयार केले होते. ते बघून या वर्षीच्या संक्रांतीसाठी मला नात्यातल्या एकाजणानी सूनेच्या पहिल्या संक्रान्तीसाठी आणि तसेच २ बाळांच्या बोरन्हाणासाठी हलव्याचे दागीने करून मागितले आहेत. कार्यक्रम २६ जानेवारीला असून सध्या हलवा दागिने मेकिंग इज इन प्रोग्रेस. (पहिलाच प्रयत्न आहे)
मी काही तयार झालेले नमुने इथे देत आहे. कसे झाले आहेत हे कळवा. तसेच आणि काय काय साज करतात ते पण सांगा.
नेकलेस
लाल मखमलीवर सँटिन रीबननी केलेले भरतकाम
1
2
आवडल्यास जरुर सांगा
काल रविवारी स्वीटकॉर्नचे कणीस सोलत असताना माझी लेक (वय वर्षे १८ महिने) एकदम excite होऊन म्हणाली. फ्लोक... फ्लोक (फ्रॉक).. आणि हट्ट धरून बसली की आताच्या आत्ता मला काणसाची डॉल बनवून पाहिजे.
मग काय जरा आयडियाची कल्पना लावली
मग कणीस उलवून एका पेल्यात उभं केलं. त्यावर डोकं म्हणून एक कांदा बसवला. काणसाचेच केस लावले. आणि दोन छोटे छोटे लवंगीचे डोळे.. कमरेला रिबीन डोक्यावर टोपी असा थाट केला..
आणि तयार झाली ही छोटीशी भावली..
हा अजुन एक प्रयत्न
बर्याच दिवसांनी भरतकामाचा नविन धागा उघडते आहे..
यात साखळी, गहू, गाठी, अळी, दांडी,बटन होल, भरीव आणी ईतर काही टाके वापरले आहेत.
साखळी टाका..
गहू टाका..