आमच्या आजीची शब्दसंपदा, बोलण्याची पध्दत आणि सतत बोलू शकण्याची ताकद आजकालच्या मराठीत सांगायचं तर 'अनमॅच्ड' होती. बरं शब्दांचा, म्हणींचा समृध्द खजिना असूनही किंवा असल्यामुळे, सरळ बोलणं कमीच! घरात कुणी धाकट्या काकाबद्दल 'कुठे गेलाय' विचारलं की "गेलाय उकिरडे फुंकायला" हे तिचं उत्तर. माझ्या वडलांबद्दल विचारलं तर "तो 'बडवतोय' लष्कराच्या भाकरी!" म्हणीतला 'भाजतोय' हा सर्वमान्य शब्द तिला अमान्य होता. स्वरचित म्हणीतर जागोजागी वापरल्या जायच्या. माहेरी आलेल्या आत्यांनी जराजरी कुरकूर केली तर आजी म्हणायची. "हाता-तोंडाशी गिळायला देतात वहिन्या तर खावं-प्यावं, चार दिवस आराम करावा! पण नाही!
'मला कंटाळा येतो आजकाल टीव्ही लावायला." आई वैतागून म्हणाली.
'आं?' हे प्रकरण नवं होतं. नाहीतर ६:३० वाजता होम मिनिस्टर, ७ ला तू तिथे मी, ७:३० ला ससुराल सिमरका + राधा ही बावरी (parallel mode मध्ये), ८ ला बालिकाबधू आणि ९ वाजता पवित्र रिश्ता असा रोजचा भरगच्च कार्यक्रम असतो.
'बरी आहेस ना?'
म्हातारी मेल्याचे दुःख (२२ फेब्रुवारी २०१३)
काल हैदराबादमध्ये पुन्हा दोन बॉम्बस्फोट झाले. सकाळी उठल्यावर चहा पिताना ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकताना पाहिली. “पुन्हा??” असा विचार मनात येतो तेवढ्यात खोलीत माझी रूममेट आली तशी लगेच तिला ही ब्रेकिंग न्यूज दिली. तिने डीटेल्स विचारले तेव्हा तोंडातून अभावितपणे शब्द निसटले, “ज्यादा नहीं, अभी तक सिर्फ पॉंच!” बोलल्याक्षणीच खाडकन् तोंडात मारून घ्यावीशी वाटली.
'भावोजी आले, भावोजी आले' असा पुकारा झाला आणि प्रिया लगबगीने तबक घेऊन बाहेर धावली. तिच्यामागून अनुक्रमे प्रथमेश (तिचा नवरा), नयनाबाई (सासूबाई), सुरेशराव (सासरेबुवा), अर्चना (नणंद) आणि हेमंत (नणंदेचा नवरा) अशी सगळी वरात बाहेर गेली तसं अनुसूयाबाईंनी नाक मुरडलं. 'बघा, बघा कशी सगळी बाहेर पळाली. आत्याची आठवण आहे का कोणाला?' वसंतरावांनी म्हणजे त्यांच्या यजमानांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले 'अग, तू अमिताभ बच्चन. ह्या ना त्या जाहिरातीत सदानकदा दिसणार. तो भावोजी एकदा आला, त्या आमीर खानसारखा. तू जा बघू बाहेर.