सासामुमो - २
सटाणा तालुक्यातील मुल्हेरगड हा प्राचिनकाळी मयुरगड म्हणुन ओळखला जात असे. रत्नपूरचा राजा मयूरध्वज याच्या नावा वरुन गडाला मयूरगड हे नाव पडले. मुल्हेर गडाला महाभारत कालीन इतिहास आहे. तेराव्या शतकात बागलाणच्या बागुल राजाने बांधलेल्या या किल्ल्यावर अकबर, शाहजहान, औरंगजेब आदी मुघल राजांनी राज्य केले. १६७२ला मुल्हेरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.
सासामुमो - १
५,४०० फुटांवरील कळसुबाई म्हणजे महाराष्ट्राच एव्हरेस्ट तर ५,१४१ फुटांवरील साल्हेर हे गडकिल्ल्यां मधिल एव्हरेस्ट. समुद्रसपाटी पासुन वाघांबे साधारण १,५०० ते २,००० फुट उंचीवर असले, तरी साल्हेरच्या माथ्या पर्यंतची उंची बघुन छातीत नक्कीच धडकी भरते. आकाशाला भिडलेले परशुराम मंदिर म्हणजे साल्हेरचा कळस. पौराणीक कथां नुसार परशुरामाने इथे तप केले. परशुराम कृपेने निर्माण झालेल्या मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्या बागलाण प्रांताला वरदान ठरलेल्या आहेत.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचे वेड रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही...
घडाळ्याच्या काट्यांवर धावणार्या आम्हा धारकर्यांना वरिल वाक्यांनी क्षणात स्फुरण चढते.. नी मग ध्यास लागतो तो आपल्या आवडत्या छंदाचा आणि त्याला खतपाणी घालणार्या मित्रांचा... कधी, कोण, कुठे असले शुल्लक प्रश्ण मागे पडतात, नी मग वाट पकडली जाते ती सह्याद्रीच्या पायथ्याची...