ही असते तेव्हा ती नसते
Submitted by बेफ़िकीर on 5 November, 2013 - 09:45
ही असते तेव्हा ती नसते
ती असते तेव्हा ही नसते
आताशा हे समजत नाही
ती येथे असते की नसते
आनंदाची घटिका म्हणते
की दिसते तेथे मी नसते
बरळत असतो काहीबाही
तुझी ओढलेली री नसते
शुद्ध मराठी वृत्ती माझी
या बडग्यामध्ये घी नसते
मनामधे नसते ती असते
मनामधे असते जी नसते
'बेफिकीर'ची ट्यूशन लावू
मनही रमते अन् फी नसते
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: