Submitted by बेफ़िकीर on 5 November, 2013 - 09:45
ही असते तेव्हा ती नसते
ती असते तेव्हा ही नसते
आताशा हे समजत नाही
ती येथे असते की नसते
आनंदाची घटिका म्हणते
की दिसते तेथे मी नसते
बरळत असतो काहीबाही
तुझी ओढलेली री नसते
शुद्ध मराठी वृत्ती माझी
या बडग्यामध्ये घी नसते
मनामधे नसते ती असते
मनामधे असते जी नसते
'बेफिकीर'ची ट्यूशन लावू
मनही रमते अन् फी नसते
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेफिकीर, विनोदी पद्धतीची गझल.
बेफिकीर,
विनोदी पद्धतीची गझल.
मला आवडलेल्या ओळी....
मनामधे नसते ती असते
मनामधे असते जी नसते
आनंद वाटला... छानच
आनंद वाटला...
छानच
ही असते तेव्हा ती नसते ती
ही असते तेव्हा ती नसते
ती असते तेव्हा ही नसते......वा वा
आनंदाची घटिका म्हणते
की दिसते तेथे मी नसते......हम्न !
मनामधे नसते ती असते
मनामधे असते जी नसते........अगदी अगदी
'बेफिकीर'ची ट्यूशन लावू
मनही रमते अन् फी नसते ..........आर-पार !
धन्यवाद !
'बेफिकीर'ची ट्यूशन लावू मनही
'बेफिकीर'ची ट्यूशन लावू
मनही रमते अन् फी नसते >>ढासू
ह्या "असल्या" गोष्टी मूळातच
ह्या "असल्या" गोष्टी मूळातच असाव्या लागतात . ट्युशनचा कितपत फायदा होतो माहित नाही !
शेर छानच्चय्त सगळे मजा आली पण
शेर छानच्चय्त सगळे मजा आली पण काही ओळी मला वृत्तात वाचता येत नाही आहेत द्रूत गझल नावाचा एक प्रकार आजच पाहिला तो तर नसावा ?
गै न
असो
काही शेर असे वाचले ...सवयीप्रमाणे
आधीपासुन बरळत असतो
मी तुझी ओढली री नसते
मी शुद्ध मराठी वृत्तीचा
या बडग्यामध्ये घी नसते
जी मनात नसते ती असते
ती मनात असते जी नसते
'कृ गै न
धन्स
___________________________________
एक शेर आठवला....
तू तुझी तब्येत सांभाळून कविता करत जा
की मला समजेल आता चांगला आहेस तू ...
टेक केअर..... "बेफिकीर" असलात तरी
बरळत असतो काहीबाही तुझी
बरळत असतो काहीबाही
तुझी ओढलेली री नसते
शुद्ध मराठी वृत्ती माझी
या बडग्यामध्ये घी नसते
बढिया झालेत शेर.
कालच हे थोपुवर वाचलं. आवडलं.
कालच हे थोपुवर वाचलं. आवडलं.
मला आता नेमक्या कोणत्या लयीत
मला आता नेमक्या कोणत्या लयीत वाचायचे आहे ते समजले आहे त्यामुळे सर्व ओळी एका लयीत वाचता आल्या
कालच्या माझ्या प्रतिसादाबद्दल दिलगीरी व्यक्त करतो क्षमस्व
वैवकु, तुमच्या सर्वच
वैवकु, तुमच्या सर्वच प्रतिसादांची व्हॅलिडिटी बहात्तर तास धरतो मी! चिंता नसावी.
प्रतिसादांची र्हाऊदेत चालेल
प्रतिसादांची र्हाऊदेत चालेल ... गझलांची ?
ही असते तेव्हा ती नसते ती
ही असते तेव्हा ती नसते
ती असते तेव्हा ही नसते
व्वा