दिवाळी फराळ -विडंबन

दिवाळी फराळ -विडंबन

Submitted by Anvita on 31 October, 2013 - 23:44

( उन जरा जास्तच आहे....... ह्या चालीवर वाचावे.
खूप वर्षांपूर्वी लिहिले होते. दिवाळीच्या निम्मिताने इथे टाकते आहे. गोड मानून घ्यावे )

काम जर जास्तच आहे , असं दर दिवाळीला वाटत
निरनिराळ्या शंकांचं काहूर मनी दाटत
दरवर्षी दिवाळी येते , दरवर्षी असं होत
फराळाचे पदार्थ करायला घेतले कि त्याच हसं होत
करंजीचे फोड बघायला आधी मन अधीर होत
नाहीच आले फोड तर मग मात्र बधिर होत
चकल्या करायला घेतल्या कि त्या हटकून हसतात
फराळाचे सगळेच बेत असे हळूहळू फसतात
तिने केलेले पदार्थ त्याला मुळीच आवडत नाहीत
कसे नक्की करायचे ते तिला तरी काय माहित
मग ती थकून रुसून बसते कोपऱ्यात

विषय: 
Subscribe to RSS - दिवाळी फराळ -विडंबन