Submitted by Anvita on 31 October, 2013 - 23:44
( उन जरा जास्तच आहे....... ह्या चालीवर वाचावे.
खूप वर्षांपूर्वी लिहिले होते. दिवाळीच्या निम्मिताने इथे टाकते आहे. गोड मानून घ्यावे )
काम जर जास्तच आहे , असं दर दिवाळीला वाटत
निरनिराळ्या शंकांचं काहूर मनी दाटत
दरवर्षी दिवाळी येते , दरवर्षी असं होत
फराळाचे पदार्थ करायला घेतले कि त्याच हसं होत
करंजीचे फोड बघायला आधी मन अधीर होत
नाहीच आले फोड तर मग मात्र बधिर होत
चकल्या करायला घेतल्या कि त्या हटकून हसतात
फराळाचे सगळेच बेत असे हळूहळू फसतात
तिने केलेले पदार्थ त्याला मुळीच आवडत नाहीत
कसे नक्की करायचे ते तिला तरी काय माहित
मग ती थकून रुसून बसते कोपऱ्यात
त्याच तीच भांडण हे असं दिवाळीच्या दिवसात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तय माझं असच होईल अगदी
मस्तय

माझं असच होईल अगदी काही वर्षांनी
आवडल्याबद्दल धन्यवाद
आवडल्याबद्दल धन्यवाद !
मैत्रिणीची हि अवस्था बघूनच सुचले होते .
.
.
मस्तच.
मस्तच.
हुरूप जरा जास्तच आहे यंदा,
हुरूप जरा जास्तच आहे यंदा, असे दर दिवाळीला वाटते
निरनिराळ्या शंकांचे काहूर मनी दाटते
फराळाचे पदार्थ करायला घेतले की त्याचे अपरूप वाटते
खरपूस करंजीचे कोड कौतुक करायला मन अधीर होते
जमल्या तर ठीक, न जमल्या तर मन सुधीर होते
चकल्या करायला घेतल्या की हटकून बरे वाटते
फराळाचे पदार्थ हसले तरी, हुरूपाचे कौतुक वाटते
तिने केलेले पदार्थ न का आवडेनात,
तिचे प्रयास त्याला मात्र फार आवडतात
कसे नक्की करायचे ते तिला तरी कुठे माहीत असते
थकून भागून ती हिरमुसून बसते
त्याचे आणि तिचे हे असे जरी बिनसते
तरी ही तर केवळ नव्या हुरूपाची सुरूवात असते
हे सगळे केले, त्याचे यथावकाश सार्थक होते
पुढे ती जे जे करत जाते, ते ते त्याला रुचत जाते
(No subject)
दोन्हीही कविता आवडल्या.
दोन्हीही कविता आवडल्या.
नरेंद्र गोळे , तुमचा positive
नरेंद्र गोळे , तुमचा positive attitude आवडला .
अंजू , श्री , sonalils धन्यवाद !
(No subject)