तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
दाल की बात
विकणारांची शिजु लागली
खाणारांची शिजणार कशी,.?
आता स्वयंपाकी भातावरती
वरणी डाळ सजणार कशी,.?
अपेक्षांचा चुराडा करत
'अच्छे दिन' वर हा घात आहे
सामान्यांना न परवडणारी
जणू ही "दाल की बात" आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भाव वाढीत
का असं करतात लोक
ते अजुनही गुप्त आहे
जे काही खपत आहे
ते सुध्दा लपत आहे
ज्याचा तुटवडा भासेल
त्याचे भाव भडकतात
प्रत्येक वाढत्या भावामध्ये
सामान्य लोक अडकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भाव वाढीत
का असं करतात लोक
ते अजुनही गुप्त आहे
जे काही खपत आहे
ते सुध्दा लपत आहे
ज्याचा तुटवडा भासेल
त्याचे भाव भडकतात
प्रत्येक वाढत्या भावामध्ये
सामान्य लोक अडकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पैसा
पैशासाठी जगतात लोक
पैशासाठी मरतात लोक
पैशांसाठी तर कधी-कधी
माणसांनाही मारतात लोक
पैसे मिळवण्या माणसांमध्ये
नको ती हिंमत आली आहे
माणसं झालेत कवडीमोल
पैशाला किंमत आली आहे,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
जाहिराती मधून
लक्ष आकर्षीत करण्यासाठी
भलता आटा-पिटा असतो
पण त्याची पडताळणी हवी
किती खरा,किती खोटा असतो
देखीव पणात अविश्वासाची
सरळ डोळ्यात धूळ असते
कित्तेक जाहिरातीं मधून तर
केवळ दिशाभुल असते,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
डेली रूटींग
त्याच-त्याच गोष्टी करून
कधी मनंही विटले जातात
रोज-रोजच्या गोष्टींपासुन
मुद्दामहून टर्न घेतले जातात
कोणी सांगण्याची गरज नाही
आपणंच समजुन घ्यावं लागतं
कितीही टर्न घेतले तरीही
डेली रूटींगवर यावं लागतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
टोल
टोल बंदच्या मागणीत
हेच तर पुढे-पुढे होते
पुढाकार घेत-घेत
तळमळीचे राडे होते
पण चित्र पालटले अन्
तेच सत्तेत बसले आहेत
विसंबुन बसलेले त्यांच्यावर
टोल बाबतीत फसले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
प्रॉपर्टी
ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे
त्याला त्याची किंमत कळते
कित्तेक कित्तेक कामांसाठी
प्रॉपर्टीनेच तर हिंमत मिळते
स्वाभिमानाची मनामध्ये
प्रॉपर्टी ताकत भरू शकते
तर कधी आपलीच प्रॉपर्टी
आपल्याला घातक ठरू शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कांदा खाण्यासाठी
हल्ली चर्चा-चर्चांना लागलेला
कांदा भाववाढीचा वास आहे
रोज कांदे खाणारांचाही आता
बिना कांद्याचाच घास आहे
वाढत्या भावामुळे कदाचित कांदे
दैनंदिन जेवनातुन हरवले जातील
अन् कांदा खाण्यासाठी मात्र
आठवडी दिवस ठरवले जातील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३