बबडी माझी ....
Submitted by पुरंदरे शशांक on 8 October, 2013 - 23:56
बबडी माझी ....
बबडी माझी एक्टीची
नाही आणखी कुणाची
गाणी- गप्पा खूप मजा
दोस्त आहे बाबा माझा
गर्गर गर्गर फिरवताना
मस्त मज्जा चक्करताना
नक्कल करीत सांगतो गोष्ट
सुंदर परी, चेटकीण दुष्ट
पेन्सिल पेन घेऊन म्हणे
चित्र काढीन तुझे मने
डोळे तिरळे, नाक नक्टे
मलातर तू अशीच दिस्ते
चिडवतो इतके मला जरी
आवडते माझी बबडी भारी
विषय:
शब्दखुणा: