गणेशचतुर्थी दिवशी प्रतिष्ठापित केलेल्या मुर्तीचे ठरलेल्या दिवशी समुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का?
समजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का? तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का?
उद्या गणेशविसर्जन. त्यानिमित्त एका उपक्रमाची ही माहिती.
माझ्या एका स्नेह्याने यावर्षीच्या गणेशोत्सवात केलेला हा उपक्रम मायबोलीच्या वाचकांना माहीत असावा म्हणून हा लेख. हा मित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा अभ्यासक. पर्यावरणवादी आणि त्यासाठी कांहीना कांही परिश्रम घेणारा. रूढार्थाने मुळीच धार्मिक नसलेला. शाडूची गणेशमूर्ती मिळाली नाही तर धातूचा गणपती बसवून त्याशेजारी सुपारीचा गणपती ठेवून त्या सुपारी-गणपतीचे विसर्जन करणारा. यावर्षीचा त्याचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे म्हणून देत आहे. याबाबतची त्यांची भूमिका खाली देत आहे.