आठवणीतले पुस्तक
Submitted by सारीका on 12 September, 2011 - 04:26
माझ्याकडे चंपक, चांदोबा, प्रकाश प्रकाशनची गोष्टीची पुस्तके, अमर चित्रकथा, आणि आई बाबा जी पुस्तके आणून देतील त्या सर्व पुस्तकांना एकत्रित करुन त्याचे मोठे बाइंडींग बुक तयार केले होते.
त्यात जादूच्या गोष्टी, परीकथा, राजकुमारी, राजपुत्रांच्या कथा अकबर बिरबल अशी बरीच पुस्तके होती.
माझे बाबा रद्दीवाल्याकडेही जे पुस्तक मिळेल ते माझ्यासाठी आणायचे.. ते बाइंडींग बुक माझ्याकडे २००२ पर्यंत होते..
मी माझ्या एका मित्राला ते वाचायला दिले, अन नंतर विसरुन गेले..
काही महीन्यांनी त्याच्याकडे पुस्तक मागितले तर त्याच्या आईने ते रद्दीत विकल्याचे कळले (खुप वाईट वाटले)
विषय:
शब्दखुणा: