आठवणीतले पुस्तक

Submitted by सारीका on 12 September, 2011 - 04:26

माझ्याकडे चंपक, चांदोबा, प्रकाश प्रकाशनची गोष्टीची पुस्तके, अमर चित्रकथा, आणि आई बाबा जी पुस्तके आणून देतील त्या सर्व पुस्तकांना एकत्रित करुन त्याचे मोठे बाइंडींग बुक तयार केले होते.
त्यात जादूच्या गोष्टी, परीकथा, राजकुमारी, राजपुत्रांच्या कथा अकबर बिरबल अशी बरीच पुस्तके होती.
माझे बाबा रद्दीवाल्याकडेही जे पुस्तक मिळेल ते माझ्यासाठी आणायचे.. ते बाइंडींग बुक माझ्याकडे २००२ पर्यंत होते..
मी माझ्या एका मित्राला ते वाचायला दिले, अन नंतर विसरुन गेले..
काही महीन्यांनी त्याच्याकडे पुस्तक मागितले तर त्याच्या आईने ते रद्दीत विकल्याचे कळले Sad (खुप वाईट वाटले)
त्यात 'बेबी' नावाचे पुस्तक होते, कथा स्वातंत्र्यपुर्व काळातली होती..
बेबीचा शाळेतला श्रीगणेशा, तिचे हट्ट, बाहुला बाहुलीचे लग्न, त्यातील मंगलाष्टक बेबीने लिहीलेले पत्र, बेबीची हुशारी, गणितात सर्वच मुली नापास आहेत अशी मारलेली थाप..
दुर हटो हे गाणे, किंवा एक रुपयाची मोड ४ चार आणे सुध्दा असते हे तिला मान्यच नसणे..
असे खुप किस्से आहेत..
या पुस्तकाचे लेखक मला माहीत नाहीत.. पण जर कोणास या पुस्तकाबाबत माहीती असेल तर जरुर कळवा..
आपलेही असे काही अनुभव असतील तर इथे शेअर करा...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users