मराठी माणसाला एकही धंदा जमत नाही

मराठी माणसाला एकही धंदा जमत नाही

Submitted by बेफ़िकीर on 2 September, 2013 - 12:30

हवेसे एकमेकांना तरीही एकमत नाही
मराठी माणसाला एकही धंदा जमत नाही

फुगाही चार आण्यांचा समाधानी करत होता
दिली इस्टेट सारी पण अता पिल्लू रमत नाही

घरी जा शांत चित्ताने कधीची भंगली कवटी
अहं असल्यामुळे मित्रा चिता माझी शमत नाही

जगाला वाटते की पातळी खालावली याची
तिथे मी पोचलो आहे जिथे मीही नमत नाही

मला वृद्धापकाळाची नशाही मारते डोळे
तुझे तारुण्यही आता पुरेसे चमचमत नाही

तुला शोधायच्या इच्छेमुळेही धाप का लागे
तुला दुर्लक्षिणारा का कधीसुद्धा दमत नाही

ऋतूंना घेउदे जिम्मा सुगंधाच्या प्रसाराचा
तसाही 'बेफिकिर'चा शेर हल्ली घमघमत नाही

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - मराठी माणसाला एकही धंदा जमत नाही