Submitted by बेफ़िकीर on 2 September, 2013 - 12:30
हवेसे एकमेकांना तरीही एकमत नाही
मराठी माणसाला एकही धंदा जमत नाही
फुगाही चार आण्यांचा समाधानी करत होता
दिली इस्टेट सारी पण अता पिल्लू रमत नाही
घरी जा शांत चित्ताने कधीची भंगली कवटी
अहं असल्यामुळे मित्रा चिता माझी शमत नाही
जगाला वाटते की पातळी खालावली याची
तिथे मी पोचलो आहे जिथे मीही नमत नाही
मला वृद्धापकाळाची नशाही मारते डोळे
तुझे तारुण्यही आता पुरेसे चमचमत नाही
तुला शोधायच्या इच्छेमुळेही धाप का लागे
तुला दुर्लक्षिणारा का कधीसुद्धा दमत नाही
ऋतूंना घेउदे जिम्मा सुगंधाच्या प्रसाराचा
तसाही 'बेफिकिर'चा शेर हल्ली घमघमत नाही
-'बेफिकीर'!
========================================
चुका काढू नका कोणी कुणाच्या चालण्यामध्ये
पुरेशी घेतली असल्यामुळे मी डगमगत नाही
========================================
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शमत्,दमत्,चमचमत्,घमघमत हे फार
शमत्,दमत्,चमचमत्,घमघमत हे फार आवडले.
एकाच गझलेतील काही शब्दांचा वारंवार झालेला उच्चार गझलेच्या रसास्वादात बाधक ठरतो अशी काहिशी मागे झालेली एक चर्चा आठवली.
हवेसे एकमेकांना तरीही एकमत
हवेसे एकमेकांना तरीही एकमत नाही
मराठी माणसाला एकही धंदा जमत नाही
हे सत्य कधी गझलच्या परिवेषात येईलसे वाटले नव्हते
शेर घमघमताहेत.
सगळे शेर नेहमीप्रमाणे हटके
सगळे शेर नेहमीप्रमाणे हटके सगळे आवडले
सगळे खतरनाक शेर....सुपर्ब
सगळे खतरनाक शेर....सुपर्ब गझल!
मतला भन्नाट ! रमत, नमत, शमत
मतला भन्नाट !
रमत, नमत, शमत अफलातुन !
मला वृद्धापकाळाची नशाही मारते
मला वृद्धापकाळाची नशाही मारते डोळे
तुझे तारुण्यही आता पुरेसे चमचमत नाही << हा हा....मस्त...व्वा ! .>>
काही सुटे सानी मिसरे पण छान आहेत.
दोन, तीन, पाच हे शेर आवडले.
दोन, तीन, पाच हे शेर आवडले.
प्रगती आहे.
प्रगती आहे.
जगाला वाटते की पातळी खालावली
जगाला वाटते की पातळी खालावली याची
तिथे मी पोचलो आहे जिथे मीही नमत नाही...
हा शेर एकदम मस्त................
अहो असं कसं काय? ते चि**ळे*
अहो असं कसं काय?
ते चि**ळे* नाही का आहेत धंद्यात...
सध्या हेच एक उदाहरण आठवले ... बाकी बरीच आहेत. (ह. घ्या.)
फुगाही चार आण्यांचा समाधानी
फुगाही चार आण्यांचा समाधानी करत होता
दिली इस्टेट सारी पण अता पिल्लू रमत नाही
घरी जा शांत चित्ताने कधीची भंगली कवटी
अहं असल्यामुळे मित्रा चिता माझी शमत नाही
मला वृद्धापकाळाची नशाही मारते डोळे
तुझे तारुण्यही आता पुरेसे चमचमत नाही
ऋतूंना घेउदे जिम्मा सुगंधाच्या प्रसाराचा
तसाही 'बेफिकिर'चा शेर हल्ली घमघमत नाही
शेर फार आवडले.
फुगाही चार आण्यांचा समाधानी
फुगाही चार आण्यांचा समाधानी करत होता
दिली इस्टेट सारी पण अता पिल्लू रमत नाही
घरी जा शांत चित्ताने कधीची भंगली कवटी
अहं असल्यामुळे मित्रा चिता माझी शमत नाही
>> मस्त !!
बेफी जबरदस्त गझल. काही शेर
बेफी जबरदस्त गझल.
काही शेर विशेष आवडले.
पुलेशु!
जब्रा गझल. आवडली.
जब्रा गझल. आवडली.
'चमचमत' आणि 'घमघमत' हे सर्वात
'चमचमत' आणि 'घमघमत' हे सर्वात विशेष वाटले.