कवठीचाफा
माझं त्याच्या आयुष्यात येणं ही पूर्वनियोजितच होत्त. हां तसा थोडा उशीर झाला जरा लवकर येता आलं असतं तर त्याला अजून समजून घेता आलं असतं आणि कदाचित कथेचा शेवट त्याला त्याच्या रीतीने करता आला असता आणि ती कथा तुम्हाला आम्हाला वाचायला मिळाली असती. पण या सर्व जर तर च्या गोष्टी खरंच त्याला कथा संपवायची होती का ही त्याचा तोची जाणे. खरतर तुम्हा सर्वानाच उत्सुकता असेल की कवठीचाफाला ओळखणारी ही आसामी कोण? पण त्याच्या प्रमाणेच मला ही अनभिज्ञ राहून माझा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोण सांगायला आवडेल. हा दृष्टिकोण सगळ्यानाच आवडणार नाही पण मी जेवढा त्याला जवळून पाहिलंय तितका तुम्ही कोणी नसेल अनुभवला.
