दही हंडी
Submitted by व्यत्यय on 30 August, 2013 - 02:47
अंकुश सावंत कालपासूनच उदास होतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सव आलेलो. तेच्या आवशीन अंकुशाक कधी दहीहंड्येक जावूक दिल्यान नाय. “बाकीच्यान्का चार चार प्वारा आसत, माजो एकलोच आसा” ह्या तिचा म्हणणा. अंकुश शिकलो, मोठ्या कंपनीत सायेब झालो तरी तेच्या मनातलो सल काय जावूक नाय. भायेर लाऊडस्पीकरवरून “मच गया शोर” गाणा लागला की भूतूर अंकुश पाण्याभायेरल्या मासोळीसारखो फडफडायचो. अंकुश ल्हान असताना सावतीन तेका तेच्या मामाकडे धाडून देयची. अंकुशचो मामा चाळ्येत नाय तर येका कोलनेत रवायचो. थयसर ह्या दहीहांडेचा धुमशान नवता. आतापन चेहरो पाडून बसलेल्या तेका बघान सावतीनीने त्वांड सोडल्यान.
विषय:
शब्दखुणा: