जिगसॉ पझल्सच्या माझ्या वेडाबद्दल पूर्वी मी मायबोलीवर लिखाणं करत असे. आता त्याबद्दल लिहित नसले तरी हे वेड अजून आहेच.
नुकतीच मी ' अ टेल ऑफ थ्री सीटीज' ही तीन जिगसॉ पझल्सची सीरीज पूर्ण केली. ही पझल्स मी फारच वेगाने म्हणजे सरासरी २.५ तासात पूर्ण केली. ब्रेन मस्त स्टिम्यूलेट झालेला अनुभवला.
ग्रीस, पॅरीस आणि व्हेनीस. ह्यातल्या ग्रीसला अजून गेले नाहीये, पण जायची इच्छा आहे. पॅरीस आणि व्हेनीस दोन्ही माझी आवडती ठिकाणं. पझल्स लावताना ती शहरं, तिथला प्रवास, त्या गल्ल्या, तिथलं वातावरण आठवत होतं. ह्या आठवणींची देखील आपलीच एक वेगळी मजा. वेगळा प्लेवर. एकूणच धमाल अनुभव आला ही पझल्स सोडवताना.
माझी नविन लोकरीची पर्स....
थोडी बरोबर नाहि झाली आहे.. पण तुम्ही सांभाळुन घ्याल ना ?

मुलीचा वाढदिवसानिमित्त बनवला होता हा गुच्छ...बच्चे कंपनी विशेष तुटून पडली ह्यावर.मोठे ही खाल्ले.नंतर पिझ्झा आणी केक खाऊन कॅलरीस वाढव्ल्याचि अपराधि भावना कोणाचा चेहर्यावर नव्हति 
१. आधी कलिंगड व्यवस्थित कापून घेतल....
२. अनन्स व किवि कापून घेतल
३.फोटोत दाखवल्या प्रमाणे फळे काड्यांध्ये टोचुन घेऊन ते नंतर कलिंगड्यावर सजवावे
टिप्स :कलिंगड शक्य तेवढ उशीरा कापवे(कार्यक्रमाचा ४५ मिन्स आधि). जेणे करून त्याचा ताजे पणा टिकून राहिल.
लवकर कापणार असाल तर फ्रिज मध्ये न ठेवता त्यावर प्लस्टिच ने झाकावे.फ्रिज मधे ठेवल्यास त्याला सुरकुत्या पडून,त्याचा ताजे पणा निघून जातो.
नमस्कार,,
तुम्हा सर्वांना ख्रिसमस आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभे्च्छा !!

मायबोली वरिल गुलमोहर - कला, हस्तकला, इतर कला मधले धागे वाचुन बरेच प्रश्न पडतात ..
हे कुठे मिळेल ?, ते कुठे मिळेल ?, हे कस करु ? ई. अनेक अनेक ...
म्हणुन हा धागा काढत आहे .. माझे सध्याचे काही प्रश्न..
१) क्रॉस स्टीच साठी लागणारा कॅन्व्हास सहसा कुठे मिळतो ? काय म्हणुन मागायचा?
नवी मुंबईत कुठे मिळेल?
२) भरत कामासाठी लागणार्या दोर्याच्या गुंड्या (त्या जरा वेगळ्या असतात ना?) त्या कुठे मिळतिल ?
तसेच त्या साठी लागणार्या लकडी रिंग्ज सहसा कुठे मिळ्तात (नवी मुंबई मध्ये कुठे?)
अशा सगळ्या गोष्टी मिळणारे एखादे खास या वस्तुंसाठी असलेले दुकान कोणते?