येत नाही जे पुन्हा ते वय जगत आहेस तू

येत नाही जे पुन्हा ते वय जगत आहेस तू

Submitted by बेफ़िकीर on 24 August, 2013 - 10:49

तू कसा होतास याची सय जगत आहेस तू
येत नाही जे पुन्हा ते वय जगत आहेस तू

भक्त गाभार्‍यात नाही येत केव्हाही तुझ्या
एवढे नक्की कशाचे भय जगत आहेस तू

जीवनाची तेवढी केलीस तर लाभेल सुख
प्रकृतीची करत जी हयगय जगत आहेस तू

बांध घालावा कसा ही काळजी सोडून दे
वाहत्या लाखो क्षणांचा व्यय जगत आहेस तू

मान्य नाही आज तू नाहीस ही वस्तुस्थिती
आठवांचा होउनी संचय जगत आहेस तू

वाचकांचे नेत्र आसावून झगमगलेत ना
प्राप्त अंधारात तेजोमय जगत आहेस तू

आरश्याला दाखवाया तोंडही नाही तुला
पण तरी करुनी स्वतःची गय जगत आहेस तू

फार पूर्वी मी तुझ्या धुंदीत होत्या जुळवल्या

Subscribe to RSS - येत नाही जे पुन्हा ते वय जगत आहेस तू