तू कसा होतास याची सय जगत आहेस तू
येत नाही जे पुन्हा ते वय जगत आहेस तू
भक्त गाभार्यात नाही येत केव्हाही तुझ्या
एवढे नक्की कशाचे भय जगत आहेस तू
जीवनाची तेवढी केलीस तर लाभेल सुख
प्रकृतीची करत जी हयगय जगत आहेस तू
बांध घालावा कसा ही काळजी सोडून दे
वाहत्या लाखो क्षणांचा व्यय जगत आहेस तू
मान्य नाही आज तू नाहीस ही वस्तुस्थिती
आठवांचा होउनी संचय जगत आहेस तू
वाचकांचे नेत्र आसावून झगमगलेत ना
प्राप्त अंधारात तेजोमय जगत आहेस तू
आरश्याला दाखवाया तोंडही नाही तुला
पण तरी करुनी स्वतःची गय जगत आहेस तू
फार पूर्वी मी तुझ्या धुंदीत होत्या जुळवल्या
आज त्या ओळींतला आशय जगत आहेस तू
खंगल्या लालावलेल्या पश्चिमेचा मी कवी
रोज माझ्यातून अरुणोदय जगत आहेस तू
तू कुणी आहेस निव्वळ वल्गना आहे तुझी
जन्मदात्यांचा तुझ्या निर्णय जगत आहेस तू
हे नको मानूस की नातेच नाही आपले
ठाम नसण्याचा तुझा निश्चय जगत आहेस तू
माणसे धरतील ना धरतील ठेका... पण तरी
बेफिकीरीने स्वतःची लय जगत आहेस तू
-'बेफिकीर'!
निर्णय्,निश्चय्,लय्,आशय.....अ
निर्णय्,निश्चय्,लय्,आशय.....अहाहा.....
क्या बात है.....
फार पूर्वी मी तुझ्या धुंदीत
फार पूर्वी मी तुझ्या धुंदीत होत्या जुळवल्या
आज त्या ओळींतला आशय जगत आहेस तू >>>___/\___
जीवनाची तेवढी केलीस तर लाभेल सुख
प्रकृतीची करत जी हयगय जगत आहेस तू>>>सह्ही!!
नेहमीप्रमाणे एक वेगळ्या धाटणीची गझल.
मान्य नाही आज तू नाहीस ही
मान्य नाही आज तू नाहीस ही वस्तुस्थिती
आठवांचा होउनी संचय जगत आहेस तू......मस्त!!!
माणसे धरतील ना धरतील ठेका... पण तरी
बेफिकीरीने स्वतःची लय जगत आहेस तू..:):) वाह वाह!
मस्त गझल!!!
हा नाही कळला- वाचकांचे नेत्र
हा नाही कळला-
वाचकांचे नेत्र आसावून झगमगलेत ना
प्राप्त अंधारात तेजोमय जगत आहेस तू
बाकी आवडली.
सर्व शेर खूप आवडले धन्यवाद
सर्व शेर खूप आवडले
धन्यवाद
लोला सोपा आहे तो शेर त्यातला तू म्हणजे स्वतः कवी आहे ज्याचे मन त्याला आज हा शेर म्हणत आहे अशी कल्पना करा ! आसावून हा शब्द २ अर्थाने वापरता ये ईल आशा उत्पन्न होवून व अश्रू तरळून अश्या दोनही वेळी डोळे झगमगतात एक चमक दिसते त्या डोळ्यांत हे तेज कविच्या मनाला दाटलेल्या त्याल कुठुन्तरी प्राप्त झालेल्या अंधारातूनच निरमाण होत असावे ....म्हणून कवीचे मन त्याला हा शेर सांगत असावे ....
वाचकांचे नेत्र आसावून झगमगलेत ना
प्राप्त अंधारात तेजोमय जगत आहेस तू
बेफीजी अवांतरासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो क्षमस्व
धन्यवाद वैवकु.
धन्यवाद वैवकु.
मस्तच... मतला आफाट आवडला
मस्तच... मतला आफाट आवडला
सर्वच शेर सुंदर. वाचकांचे
सर्वच शेर सुंदर.
वाचकांचे नेत्र आसावून झगमगलेत ना
प्राप्त अंधारात तेजोमय जगत आहेस तू
हा सर्वोच्च बिंदू.
गझल आवडली. माणसे धरतील ना
गझल आवडली.
माणसे धरतील ना धरतील ठेका... पण तरी
बेफिकीरीने स्वतःची लय जगत आहेस तू>>> व्वा!
आवडली.
आवडली.
हे नको मानूस की नातेच नाही
हे नको मानूस की नातेच नाही आपले
ठाम नसण्याचा तुझा निश्चय जगत आहेस तू........अतिशय आवडला !
मान्य नाही आज तू नाहीस ही वस्तुस्थिती
आठवांचा होउनी संचय जगत आहेस तू...........स्स्स्स्स्स्स्स्स !!!!
वाचकांचे नेत्र आसावून झगमगलेत ना
प्राप्त अंधारात तेजोमय जगत आहेस तू..........वा !
धन्यवाद
धन्यवाद
निर्णय, आशय, गय हे शेर सर्वात
निर्णय, आशय, गय हे शेर सर्वात विशेष वाटले.
व्वा बेफिकीर, स्वतः ची
व्वा बेफिकीर,
स्वतः ची हळुहळु ओळख देणारा एक रहस्यमयी कवि आहेस तू !
येणार्या जाणार्यांशी मोजून मापुन बोलतांना सारखा काहितरी शोधीत आहेस तू .
नमस्ते !
फार छान बेफिकीर, असेल वा नसेल
फार छान बेफिकीर,
असेल वा नसेल पटली तूझी ही बेफिकीरी..
जीवनाच्या संगराचा जय जगत आहेस तू
-रमा
तू कुणी आहेस निव्वळ वल्गना
तू कुणी आहेस निव्वळ वल्गना आहे तुझी
जन्मदात्यांचा तुझ्या निर्णय जगत आहेस तू
......मस्त......
बेफी, आवडली गझल
बेफी, आवडली गझल
गझल आवडली......
गझल आवडली......
व्वा. अनेक शेर
व्वा. अनेक शेर आवडले.
धन्यवाद.
धन्यवाद सर्वांचे मित्रहो
धन्यवाद सर्वांचे मित्रहो
बेफिकीर क्लास हा आपल्या
बेफिकीर क्लास हा आपल्या तेन्डल्यासारखा आहे.....
बेफिकीर फॉर्म हा आपल्या विराट कोहलीसारखा आहे.....
अत्यंत सुंदर! मान्याच!
बेफिकीर , ही गझल माझ्या
बेफिकीर ,
ही गझल माझ्या दृष्टीने केवळ अप्रतिम आहे. या गझलेसाठी तुम्हाला मिळालेले वृत्त आणि तुम्ही सांभाळलेली गती फार सुंदर आहे. मी यावर सविस्तर लिहू इच्छितो. तसे वेळ काढून लिहीनच.
धन्यवाद.
गझल फार आवडली.
गझल फार आवडली.
हा सांगावा का तो असं झालं.
हा सांगावा का तो असं झालं. सगळेच शेर भारी. पण आत्ता या वेळी तर हा टॉपला.
>> बांध घालावा कसा ही काळजी सोडून दे
वाहत्या लाखो क्षणांचा व्यय जगत आहेस तू
personal choice. यावरून अजून एक लक्षात आलं. कविता वाचताना ही होतं असं पण गजल वाचताना जास्त जाणवतं. ते म्हन्जे आपण ज्या state of mind मधे असतो त्या प्रमाणे शेर भावतात. अजून थोड्या दिवसांनी वाचली तर कदाचित दुसरा कुठला तरी one seeded असेल. Qualitatively nothing changes but emotion is one funny entity..
गजल वाचताना जास्त जाणवतं. ते
गजल वाचताना जास्त जाणवतं. ते म्हन्जे आपण ज्या state of mind मधे असतो त्या प्रमाणे शेर भावतात. अजून थोड्या दिवसांनी वाचली तर कदाचित दुसरा कुठला तरी one seeded असेल<<<
वेल सेड
पारिजाता, >> आपण ज्या state
पारिजाता,
>> आपण ज्या state of mind मधे असतो त्या प्रमाणे शेर भावतात. अजून थोड्या दिवसांनी वाचली तर
>> कदाचित दुसरा कुठला तरी one seeded असेल
यालाच प्रतिभा म्हणतात. भा म्हणजे एखादी गोष्ट दृश्यमान करण्याची क्षमता. प्रतिभा म्हणजे रसिकाच्या मनात प्रतिसृष्टी दृग्गोचर करण्याचं सामर्थ्य (असं मला वाटतं).
बेफिकीरांच्या कलाकृतीचं तुम्हाला भावलेलं वर्णन अगदी अचूक आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि बेफिकीरांना मानाचं अभिवादन!
आ.न.,
-गा.पै.
भा म्हणजे एखादी गोष्ट
भा म्हणजे एखादी गोष्ट दृश्यमान करण्याची क्षमता. प्रतिभा म्हणजे रसिकाच्या मनात प्रतिसृष्टी दृग्गोचर करण्याचं सामर्थ्य (असं मला वाटतं). <<<येस गामा जी अगदीच पटलं !!
मला 'प्रतिभा' ची अर्थासाठी अशी फोड आहे हे माहीत नव्हते मुळात असा अर्थ आहे हेच माहीत नव्हते पण वर अपण जे म्हणालात की जे म्हणजे सामर्थ्य आहे.. तोच विचार माझ्या मनात काल् परवा कवितेबाबतचे एक चिंतन करत असताना आला होता आणि आवर्जून संगायचेच तर मी कालपरवा जो प्रतिभा हा शब्द वापरून एक शेर रचला त्यानंतरच हे चिंतन घडत होते
पुनश्च धन्यवाद गामाजी
तू कसा होतास याची सय जगत आहेस
तू कसा होतास याची सय जगत आहेस तू
येत नाही जे पुन्हा ते वय जगत आहेस तू
दुसरी ओळ खास.
भक्त गाभार्यात नाही येत केव्हाही तुझ्या
एवढे नक्की कशाचे भय जगत आहेस तू
हाही छानच.
जीवनाची तेवढी केलीस तर लाभेल सुख
प्रकृतीची करत जी हयगय जगत आहेस तू
अप्रतिम शेर... हयगय हा अचूक काफिया, या शेरात एकदम फिट बसणारा.
बांध घालावा कसा ही काळजी सोडून दे
वाहत्या लाखो क्षणांचा व्यय जगत आहेस तू
खास.... आणि एक सत्य.
मान्य नाही आज तू नाहीस ही वस्तुस्थिती
आठवांचा होउनी संचय जगत आहेस तू
सुंदर...
वाचकांचे नेत्र आसावून झगमगलेत ना
प्राप्त अंधारात तेजोमय जगत आहेस तू
हं हं.....
आरश्याला दाखवाया तोंडही नाही तुला
पण तरी करुनी स्वतःची गय जगत आहेस तू
हं
फार पूर्वी मी तुझ्या धुंदीत होत्या जुळवल्या
आज त्या ओळींतला आशय जगत आहेस तू
सुंदर...
खंगल्या लालावलेल्या पश्चिमेचा मी कवी
रोज माझ्यातून अरुणोदय जगत आहेस तू
हं... छान जमलंय...
तू कुणी आहेस निव्वळ वल्गना आहे तुझी
जन्मदात्यांचा तुझ्या निर्णय जगत आहेस तू
अप्रतिम शेर... प्रत्येक हयात व्यक्तीने समजून घ्यावा असा विचार.
हे नको मानूस की नातेच नाही आपले
ठाम नसण्याचा तुझा निश्चय जगत आहेस तू
हं.. हं..
माणसे धरतील ना धरतील ठेका... पण तरी
बेफिकीरीने स्वतःची लय जगत आहेस तू
हं... हं...
मक्ता होता होता राहिलाय..... तरी छान.
एकंदरच गझल आध्यात्मिक विचारांशी साधर्म्य दाखविणारी आणि त्यामुळेच सत्याच्या अधिक जवळ जाणारी आहे हे निश्चित. अनुभव, प्रत्यक्ष भावना आणि कल्पनांचा सुरेख संगम या गझलेतून साकारला गेला आहे.
असे विचार गझलेतून दिल्याबद्दल धन्यवाद.
सिम्प्ली ग्रेट! वन ऑफ युवर
सिम्प्ली ग्रेट! वन ऑफ युवर बेस्ट!
गय चा शेर लाजवाब!
जयन्ता५२
मस्त..!!
मस्त..!!