'पारदर्शी' - श्रीमती सुप्रिया विनोद
रिमाताईंनी श्री. रत्नाकर मतकरी यांच्या 'विठो-रखुमाय', 'घर तिघांचं हवं' या नाटकांमध्ये आणि 'जौळ' या कथेवर आधारित असलेल्या 'माझं घर, माझा संसार' या चित्रपटात रिमाताईंनी अभिनय केला होता. ('माझे रंगप्रयोग' या अप्रतिम आत्मकथनात्मक पुस्तकात रत्नाकर मतकरी यांनी आपल्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. या दोन नाटकांचा व चित्रपटाचाही त्यात समावेश आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा लेखाजोखा आहे.)