कुणी कोण जाणे पुन्हा ढापले मन
Submitted by बेफ़िकीर on 23 April, 2013 - 02:07
कुणी कोण जाणे पुन्हा ढापले मन
कुठे यार आपण, कुठे आपले मन
दुरावा तुझा एवढा तीव्र झाला
तुला आज पाहून संतापले मन
मनांचा कसा काय दुष्काळ आला
जिथे पूर येतो तिथे स्थापले मन
उन्हाची तिच्या काय वाटेल भीती
जिची सावली सोसुनी रापले मन
तुझे अंगप्रत्यंग चक्रावणारे
जिथे धार नाही तिथे कापले मन
पुन्हा 'बेफिकिर' लोक सोडून गेले
रिकामेपणाने पुन्हा व्यापले मन
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: