कुणी कोण जाणे पुन्हा ढापले मन

Submitted by बेफ़िकीर on 23 April, 2013 - 02:07

कुणी कोण जाणे पुन्हा ढापले मन
कुठे यार आपण, कुठे आपले मन

दुरावा तुझा एवढा तीव्र झाला
तुला आज पाहून संतापले मन

मनांचा कसा काय दुष्काळ आला
जिथे पूर येतो तिथे स्थापले मन

उन्हाची तिच्या काय वाटेल भीती
जिची सावली सोसुनी रापले मन

तुझे अंगप्रत्यंग चक्रावणारे
जिथे धार नाही तिथे कापले मन

पुन्हा 'बेफिकिर' लोक सोडून गेले
रिकामेपणाने पुन्हा व्यापले मन

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुरावा तुझा एवढा तीव्र झाला
तुला आज पाहून संतापले मन
>> झक्कास!!

उन्हाची तिच्या काय वाटेल भीती
जिची सावली सोसुनी रापले मन

तुझे अंगप्रत्यंग चक्रावणारे
जिथे धार नाही तिथे कापले मन
>>> हेही आवडले.

कापले चा शेर दुसर्‍या ओळीत भावनेला जरा कमी पडलाय की काय असे वै म (डो़क्यालिटी वर आपण पुष्पकात बसून बोललो होतो तसे काहीसे जाणवले )

कदाचित मला अर्थ समजला नसावा म्हणूनही असे वाटत असावे
आवश्यक वाटल्यास मला विपूतून अर्थ अवश्य कळवा बेफीजी

बाकी एकेक शेर भारी

मला मतला सर्वाधिक आवडला

दुरावा तुझा एवढा तीव्र झाला
तुला आज पाहून संतापले मन

मनांचा कसा काय दुष्काळ आला
जिथे पूर येतो तिथे स्थापले मन

उन्हाची तिच्या काय वाटेल भीती
जिची सावली सोसुनी रापले मन

तुझे अंगप्रत्यंग चक्रावणारे
जिथे धार नाही तिथे कापले मन

पुन्हा 'बेफिकिर' लोक सोडून गेले
रिकामेपणाने पुन्हा व्यापले मन

मस्तच. आवडले शेर. मतला मला नीट लक्षात आला नाहि हा माझा दोष. पण जे आहे ते आकर्षक आहे.

मस्त!

मतल्यातला ‘ढापले’ शब्द कानाला तितका रुचला नाही, शिवाय गझलेचा एकंदर पोत पहाता जरा विजोड वाटला...........वै.म. लाटले शब्द बसू शकतो, पण मग काफियांचे काय?

टीप: कृपया मेल पहाल का? विस्ताराने लिहिले आहे!

दुरावा तुझा एवढा तीव्र झाला
तुला आज पाहून संतापले मन

उन्हाची तिच्या काय वाटेल भीती
जिची सावली सोसुनी रापले मन

पुन्हा 'बेफिकिर' लोक सोडून गेले
रिकामेपणाने पुन्हा व्यापले मन

हे तीन शेर फार आवडले.

कुठे यार आपण, कुठे आपले मन.. मस्त !

तुझे अंगप्रत्यंग चक्रावणारे
जिथे धार नाही तिथे कापले मन

मला हा सर्वाधिक आवडला. बढिया गझल.