मनस्मिंनी कुठल्यातरी बाफ वर लिहिलेल्या प्रतिसादात 'मी अॅडमिन असतो तर अमुक अमुक केले असते' असे लिहिले. वाचताक्षणीच विचारांचे वारू चौफेर ऊधळून आले. मनस्मि, १०-१५ मिनिटे तुमच्या कल्पनेने दिवसाढवळ्या मस्त स्वप्नरंजन करवले. धन्यवाद तुम्हाला. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
'' जलते हैं जिसके लिये..'' एक भावानुवाद
ज्यासाठी अविरत जळती
सखी तव नयनांच्या ज्योती
ते तरलतन्मयी गीत मी आणियले तुजसाठी ..
जो दु:खदाह विरहाचा
माझ्या उरात अडलेला
जो मंत्रमोह प्रीतीचा
नजरेत तुझ्या दडलेला
स्वीकारशील ना सजणी ? तो मुग्धभाव ये ओठी ..
जप ओंजळीत हृदयाच्या
हे आरस्पानी गीत
पार्यापरी मंथर अंतर
काचेपरी नाजूक प्रीत
तू ऐकशील ना सजणी ? मी गुणगुणतो एकांती ..
रसवंती तुझ्या ओठांची
जोवरी न यास मिळाली
भ्रमरासम रुंजत राहील
हे तुझ्या बटांच्या खाली
तू जाणशील ना सजणी ? श्वास हे कुणास्तव गाती..
भारती बिर्जे डिग्गीकर