'' जलते हैं जिसके लिये..'' एक भावानुवाद
ज्यासाठी अविरत जळती
सखी तव नयनांच्या ज्योती
ते तरलतन्मयी गीत मी आणियले तुजसाठी ..
जो दु:खदाह विरहाचा
माझ्या उरात अडलेला
जो मंत्रमोह प्रीतीचा
नजरेत तुझ्या दडलेला
स्वीकारशील ना सजणी ? तो मुग्धभाव ये ओठी ..
जप ओंजळीत हृदयाच्या
हे आरस्पानी गीत
पार्यापरी मंथर अंतर
काचेपरी नाजूक प्रीत
तू ऐकशील ना सजणी ? मी गुणगुणतो एकांती ..
रसवंती तुझ्या ओठांची
जोवरी न यास मिळाली
भ्रमरासम रुंजत राहील
हे तुझ्या बटांच्या खाली
तू जाणशील ना सजणी ? श्वास हे कुणास्तव गाती..
भारती बिर्जे डिग्गीकर
---------------------------------------------------------------------------
जलते हैं जिसके लिये
तेरी आंखोंके दिये
ढूंढ लाया हूं वही गीत मैं तेरे लिये..
दर्द बनके जो मेरे
दिलमे रहा, ढल ना सका
जादू बनके तेरी आंखोंमे
रुका ,चल ना सका
आज लाया हूं वही गीत मैं तेरे लिये..
दिलमे रख लेना इसे
हाथोंसे ये छूटे ना कही
गीत नाजूक हैं मेरा
शीशेसेभी, टूटे ना कही
गुनगुनाऊंगा यही गीत मैं तेरे लिये..
जब तलक ना ये तेरे
रसके भरे होठोंसे मिले
यूंही आवारा फिरेगा
ये तेरे जुल्फोंके तले
गाये जाऊंगा यही गीत मैं तेरे लिये..
(गीतकार मजरूह सुलतानपुरी,संगीतकार सचिनदा बर्मन, चित्रपट सुजाता १९५९ )
सर्व माबोकरांना
सर्व माबोकरांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !
गाणं सुंदर आहे आणि भानुवादही
गाणं सुंदर आहे आणि भानुवादही छान जमलाय !
अशा भावानुवादासाठी काही गाणी सुचवावीत असे वाटतेय. ग्रीन सिग्नल मिळेल का ?
मस्त भावानुवाद
मस्त भावानुवाद
अफाट! _______________/\______
अफाट!
_______________/\_________________
नितांतसुंदर...
वा
वा
धन्स दिनेशदा,आयडू,सुशांत, जाई
धन्स दिनेशदा,आयडू,सुशांत, जाई !
दिनेशदा,येस्सर! प्रयत्न करू.
इतके सुंदर मराठी शब्द! खुप
इतके सुंदर मराठी शब्द!
खुप सुंदर
सुंदर भावानुवाद भारतीताई,
सुंदर भावानुवाद
भारतीताई, गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा!!
अनुवाद चांगला
अनुवाद चांगला झालाय.
--------------------------------------------------------------------------------
ओळी ओळीनुसार अनुवाद होण्याऐवजी, केवळ गीतातले भाव
सोप्या शब्दात अनुवादित झाल्यास अधिक आवडतील..... वैम. कृगैन.
--------------------------------------------------------------------------------
कृपया विपू पहावी.
काय अफलातुन गाण आहे हे.
काय अफलातुन गाण आहे हे. माझ्या पहिल्या दहातले.
भारती, मस्त झालाय भावानुवाद
भारती, मस्त झालाय भावानुवाद
ठेव ते वर.
सुरेख जमलं आहे. काही काही
सुरेख जमलं आहे. काही काही शब्द फारच आवडले, जसे तरलतन्मयी, पार्यापरी मंथर अंतर..
भ्रमरासम रुंजत राहील
हे तुझ्या बटांच्या खाली
हा खूप शब्दशः अनुवाद वाटला..
आजपर्यंतच्या तुमच्या सर्व
आजपर्यंतच्या तुमच्या सर्व अनुवादांपैकी मला सर्वाधिक अवडलेला अनुवाद
अतीशय उत्तम
धन्यवाद भरतीताई
उल्हास भिडे +१
उल्हास भिडे +१
सर्वांचे आभार. आयडू,आवडत्या
सर्वांचे आभार.
आयडू,आवडत्या दहासाठी खूपच.
उल्हासजी,भरतजी,होय,त्या सोप्या प्रवाही शब्दांचा अर्थानुवाद करणे कठीणच म्हणून भावानुवाद केला..मलाही जाणवते ते,पण आग्रहाशिवाय या रचनेकडे बघता येणे शक्य असेल तर ती कदाचित बरी वाटेल.:) स्पष्ट मताबद्दल खरेच आभार.
मस्त जमलाय. अर्थ आणि भावना
मस्त जमलाय. अर्थ आणि भावना दोन्ही सुंदर उतरल्यात
वा वा मस्त! माझं अतिशय आवडतं
वा वा मस्त!
माझं अतिशय आवडतं गाणं आहे हे. तलत ने इतकं हळुवार गायलंय...
भावानुवाद अतिशय सुंदर आहे भारतीताई!!
भावानुवाद आवडला. पण अधिक
भावानुवाद आवडला.
पण अधिक चांगला होउ शकेल असे वाटते.
आभार
आभार अमेय,पुलस्ति,सुसुकु..
>>पण अधिक चांगला होउ शकेल असे वाटते>>>>
होय सुसुकु,शक्य आहेच ते नेहमीच.
. ती तशी का हे नाही सांगता येत, ती तशी असणे कवीसाठी अपरिहार्य होते,इतकेच कळते..
कुणाला हा अनुवाद अधिक सोप्या शब्दात हवा होता,कुणाला 'भ्रमरासम' हा शब्दशः अनुवाद वाटला,(जो व्यक्तिशः मला खूप आवडला होता, भ्रमराची अप्रकट प्रतिमा अनुवादात प्रकटल्याची गंमत जाणवून.) ,कुणाला ओळीओळीचा अनुवाद नको होता..तर व्यक्तीगणिक मते वेगळी.
यानिमित्ताने एकच लिहावंसं वाटतं,अनुवाद तोही कवितेचा करताना एक समांतर निर्मितीच घडते,जी निर्मितीसारखीच खरं तर हटवादी असते
भारतीताई, भ्रमरासम हे शब्दशः
भारतीताई, भ्रमरासम हे शब्दशः नव्हे तर "हे तुझ्या बटांच्या खाली " हे शब्दशः वाटले.
तुझी शब्दसंपदा बघून थक्क
तुझी शब्दसंपदा बघून थक्क व्हायला होतं गं !!
खल्लास्.(बस्स)
खल्लास्.(बस्स)
आवडला !
आवडला !
भारतीताई, खूप आवडला. कदाचित
भारतीताई, खूप आवडला. कदाचित गाण्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे असेल पण रीलेट होणं खूप सोपं गेलं