'चिंटू - २'च्या पुण्यातील शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत
'चिंटू - २' या धमाल चित्रपटाच्या शुभारंभाचा खेळ गुरुवार दि. १८ एप्रिल, २०१३ रोजी पुण्यात सिटिप्राइड, कोथरुड इथे आयोजित केला आहे.
हा खेळ संध्याकाळी साडेसात वाजता आहे.
या खेळाची काही तिकिटं आपल्याकडे आहेत. मायबोलीकरांच्या मुलांसाठी ही तिकिटं उपलब्ध आहेत.
चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळांना उपस्थित राहणार आहेत.
मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'चिंटू - २'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी तुमच्या मुलांना मिळणार आहे.