थांबण्याजोगे कुठेही दार नाही (तरही)

थांबण्याजोगे कुठेही दार नाही (तरही)

Submitted by उमेश वैद्य on 20 February, 2013 - 10:42

थांबण्याजोगे कुठेही दार नाही
थोडके चालावयाचे फार नाही

पाहिले नाही कुणी मजला दयेने
दुःख माझे गंजके जरतार नाही

का करावे मी सुखांचे फोल नियमन
टाकण्याइतका कुणावर भार नाही

कोरडा हा छानसा दुष्काळ नाला...
वाहतो आहे इथे की बारमाही

आठवांच्या पायथ्याशी गाव माझे
पत्र नाही येत किंवा तार नाही

उमेश वैद्य.

Subscribe to RSS - थांबण्याजोगे कुठेही दार नाही (तरही)