थांबण्याजोगे कुठेही दार नाही (तरही)

Submitted by उमेश वैद्य on 20 February, 2013 - 10:42

थांबण्याजोगे कुठेही दार नाही
थोडके चालावयाचे फार नाही

पाहिले नाही कुणी मजला दयेने
दुःख माझे गंजके जरतार नाही

का करावे मी सुखांचे फोल नियमन
टाकण्याइतका कुणावर भार नाही

कोरडा हा छानसा दुष्काळ नाला...
वाहतो आहे इथे की बारमाही

आठवांच्या पायथ्याशी गाव माझे
पत्र नाही येत किंवा तार नाही

उमेश वैद्य.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरडा हा छानसा दुष्काळ पाट...>>>> वृत्तात गडबड !!
बारमाहीत रदीफ नाहीये "बार नाही "....असे करा व नवीनच शेर करा (शेरही नशीला होईल त्यामुळे Wink )

तरही गझल
थांबण्याजोगे कुठेही दार नाही!
राहिले अंतर तसेही फार नाही!!

मी असा आहे सुती वस्त्राप्रमाणे.....
झगमगाया जिंदगी जरतार नाही!

फक्त सांगाडाच माझा राहिलेला.....
व्हायचा खांद्यांस आता भार नाही!

लाभ घे अथवा भले लाथाडही तू...
परत संधी दार वाजवणार नाही!

मी असे घर, बंद ज्याचे दार असते!
पत्र नाही येत किंवा तार नाही!

.............प्रा.सतीश देवपूरकर

ओ उमेशजी तो बार वाला शेर करा ना

केवढा हा कोरडा दुष्काळ आहे
आज उघडा एकसुद्धा बार नाही
>>>>>>>

आज एकादशी आहे माघी वारीची आज पंढरपुरात बार बंद ...दर वारीला लोकाना हा त्रास सहन करावाच लागतो त्यावरून सुचलाय Proud
दुष्काळ इतका भयावह आहे की केवळ दारूत मिसळून प्यायलासुद्धा पाणी नाही म्हणून बार चक्क बंद आहेत >>>> असाही अर्थ निघतो Rofl
गावातील सर्व बार बंद असणे म्हणजेच एकप्रकारचा "कोरडा दुष्काळ "असा प्रतीकात्मक अर्थही निघतो Happy

हा घ्या बारचा शेर.........उमेशराव!

पाहिजे चोवीस तासांचीच धुंदी!
आमच्याजोगा कुठेही बार नाही!!

.........प्रा.सतीश देवपूरकर