त्वचा
अतिसंवेदनशील त्वचे साठी काळजी
माझी मोठी बहिण आहे, वय 45 वर्षे, तिची अतिसंवेदनशील त्वचा आहे, आधी ती चेहर्यावर lakme radiance fairness day cream वापरत होती 3 वर्षापासुन, अचानक त्या क्रीम ने तिला जळजळ व्हायला लागली, दूसरे काही सूट होत नाही, cetaphil ch moisture hi वापरुन पाहिले, काही फरक नाही, त्वचा चांगली राहण्यासाठी तिने काय उपाय केले पाहिजेत, इथे मी हा धागा टाकतोय कारण खरच खूप छान उपाय, सल्ले इथे मिळतात, धन्यवाद सर्वांचे
त्वचाविकार Eczema Atopic dermatitis
कोणाला खात्रीशीर Eczema Atopic dermatitis या विकारावरील औषधांविषयी व घरगुती उपचारांविषयी माहिती आहे का ?
माझा ४ वर्षाच्या मुलाला लहानपणापासून हा विकार आहे. Eczema चा उद्रेक बर्याच कारणांनी होऊ शकतो. Allergy युक्त खाद्य पदार्थ हे एक कारण आहे, पण Eczema चा उद्रेक तापमानात बदल इ यांनीही होऊ शकतो. माझे लिहिण्याचे प्रमुख कारण फक्त Eczema ची माहिती देणे नाही तर त्यावरील घरगुती औषधांबद्दल माहिती गोळा करणे आहे. या विकारावर त्वचेवरून लावायची मलमे (Steroidal व इतर) मिळतात पण या औषधांचे खूप दुष्परिणाम आहेत (अंतर्जालावर अशी औषधे व दुष्परिणाम याची जंत्रीच आहे).
थंडीत त्वचेची काळजी
माझी स्किन हिवाळ्यात कोरडी होते. पण जर moisturiser वापरले तर चेहरा तेलकट होतो. घरगुती उपायांनी त्वचेचा कोरडेपणा जाऊन चेहरा तेलकट दिसणार नाही, असा काही लेप इ. कुणाला माहित आहे का?
