Submitted by मी अमि on 5 November, 2009 - 00:30
माझी स्किन हिवाळ्यात कोरडी होते. पण जर moisturiser वापरले तर चेहरा तेलकट होतो. घरगुती उपायांनी त्वचेचा कोरडेपणा जाऊन चेहरा तेलकट दिसणार नाही, असा काही लेप इ. कुणाला माहित आहे का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमि, थन्डीच्या दिवसात
अमि, थन्डीच्या दिवसात अन्घोळीचा साबण सौम्य वापरा, उदा-डोव्ह किवा सरळ एखादा बेबी सोप वापरा.....अन्घोळीच्या आधि अन्गाला तेल लवुन मालिश करा....म्हन्जे चेहरा,हात-पाय.अन्घोळीच्या आधि किमान २ तास आधि हा मसाज करुनच अन्घोळ करा (जर पॉसिबल असेल तर). आणि थन्डिच्या दिवसात कोरडेपणामुळे दोक्यात कोन्डा होण्याची पण शक्यता असते त्यामुळे केस धुवायच्या आधि केसाच्या बुन्ध्यातुन पन तेलाचा मसाज अन्घोळेच्या २ तास आधि जमत असेल तर....करुन बघा तुमचि त्वचा अजिबात फुतनार नाही.
नेहमी थंडीत त्वचेला खाज
नेहमी थंडीत त्वचेला खाज सुटते. जास्त करुन कंबर, माड्या आणी पायाला. आता ह्यावर्षी तर खुपच त्रास होतोय. कंबरेला आणि मांड्यांनवरती लालसर पुरळ आलय आणि त्या खाजवल्यामुळे काहि ठिकाणी जखमा झाल्यात. skin तर खुपच dry आणि वाईट दिसते.
सध्या रोज रात्री तीलाचे तेल गरम करुन लावतेय. साबण जवळजवळ एक दिड महिना झालाय बंदच आहे त्याएवजी मसुर डाळिचे पीठ साईत कालवून लावतेय. moisturiser लावते. पण खाज कमी होत नाहिय. काहि उपाय सांगता येईल का??
सखी तु हे उपाय नियमितपणे
सखी तु हे उपाय नियमितपणे करतेयंस का? कपडे सुती वापर... इतकं करूनही कमी होत नसेल तर डॉक्टरचा सल्ला घे.
मी उर्जिता जैनच्या अलोए वेरा
मी उर्जिता जैनच्या अलोए वेरा जेल मध्ये तिची अजुन काही तेले घालुन क्रिम बनवते आणि ते मुक्तहस्ते फासते हातपाय तोंड इ. अवयवांना
बाकी इतर काही करत नाही.
सखी, कपडे थोडे ओलसर राहताहेत का? आंघोळ झाल्यावर पावडर लावत जा, फरक पडेल. दक्षेने सांगितले तसे कपडे सुती वापर आणि काहीच फरक पडत नसेल तर डॉ. शोध.
मला पायाला गुढग्याच्या मागे खुप पुरळ यायचे, सोबत प्रचंड खाज. बेटनोवेट्-एन हे मलम लावले की आराम पडायचा. हे का होतेय याचा शोध लावायला लागले तेव्हा लक्षात आले की आंघोळ झाल्यावर वरचे अंग पुसले जाते पण घाईमुळे मांड्या, पाय, पायाची बोटे इ. ओलीच राहतात आणि मग ओलसरपणामुळे तिथे पुरळ येऊन खाज येते. आता आठवणीने अंग कोरडे करते. पुरळ गायब.
सखी अभ्यंग्य स्नान कर. म्हणजे
सखी अभ्यंग्य स्नान कर. म्हणजे झोपतना अंगाला बदामाच तेल लाव आणी आंघोळ उटण लाउन कर. आंघोळिच्या पाण्यात थोड दुध घालु शकतेस.
हो ग दक्षीणा हे मी गेले एक
हो ग दक्षीणा हे मी गेले एक दिड महिने रोजच करतेय.
रीमा आंघेळीच्या पाण्यात दुघ घालुन बघेन आता उद्यापासुन. तसेच कोरफड पण आज संध्याकाळी गेल्यावर लावायच आहे.
साधना तु कुठली तेल घालुन क्रीम बनवतेस ते सांगते का? मी पण करुन बघेन नाहितर डॉ. आहेतच.
सखी, तु भारतात आहेस की
सखी, तु भारतात आहेस की बाहेर?
असो, त्वचेची जशी बाहेरून काळजी घेतेस तशी आतूनही घ्यायला हवी.
आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर वाढव थोडा... दूध, तूप, लोणी, ताक..... इ.
सखी मी उद्या कळवते. आता
सखी मी उद्या कळवते. आता माझ्याकडे नावे नाहीत.
दक्षिणा, अग मी भारतातच आहे.
दक्षिणा, अग मी भारतातच आहे. (सगळ्यांच्या आवडत्या "डोंबिवलीत"
)
उद्या नक्की सांग साधना....
काल घरी जाताना ग्लिसरीन घेतल
काल घरी जाताना ग्लिसरीन घेतल आणि घरी गेल्यावर एका पायाला लावुन ठेवल. नंतर दुसर्या पायाला कोरफड लावल. आणि मग तीळाच्या तेलात कडुलिंबाची पान टाकून ते चांगल उकळवल आणि मस्त गरम गरम पुर्ण अंगाला फासल. आज सकाळी पण आंघोळीच्या पाण्यात मध टाकून आंघोळ केली आणि परत कालच तेल फासल. आता खाज खुपच कमी आहे आणि पुरळही कमी झालय. आता ऑफिसमधेपण घेवुन आलेय. पुन्हा दुपारी लावणार आहे.
साधना, कुठे आहेस?? तेलांची नाव आणलीस का??
अगं आहे मी इथेच. खरेतर
अगं आहे मी इथेच. खरेतर पुस्तकच उचलुन आणणार होते, पण निघताना विसरले. मी रविवारी माझ्यासाठी आणलीत तेले. क्रिम बनवायचेय. बनवताना फोटो काढते आणि इथे टाकते.
कुठलं पुस्तक?? नाव सांग ना...
कुठलं पुस्तक?? नाव सांग ना...
लवकर फोटो काढ आणि टाक
साधना..............कुठे
साधना..............कुठे आहेस???
सखे मी अॅमवे चं ऑलिव्ह ऑईल
सखे मी अॅमवे चं ऑलिव्ह ऑईल घेतलंय विकत, काल त्याने मसाज केला..
त्वचा बरिच मऊ पडलिये एका वापराने, तु ट्राय करून पहा.. शिवाय तीळाच्या तेला सारखा वास नसतो त्याला अजिबात त्यामुळे इरिटेट नाही होत.
तासभर लागुन टंकले आणि सगळे
तासभर लागुन टंकले आणि सगळे उडाले
आता परत..
माझी त्वचा तेलकट आहे. उन्हाळ्यात तेलाच्या विहिरी उसळतात आणि हिवाळ्यात इतकी कोरडी की जरा ताणले तरी फाटेल की काय असे वाटते. पावसाळा हा एकच ऋतू मानवतो. या त्वचेला कुठलेही क्रिम सुट होत नाही. मी इतक्या वर्षात कधी वापरलेही नाही, पण आता वयपरत्वे हिवाळ्यातले कोरडेपण वाढायला लागले म्हणुन क्रिमकडे वळले.
इथली उजळ कांती वाचुन अलोएवेरा जेल आणि दुकानात पाहुन कुकुंबर जेल आणले. माझ्या वहिनीने ब-याच वर्षांपुर्वी उर्जिता जैनच्या पार्ल्यातल्या सेंटरमधुन अरोमाथेरपीचा कोर्स केला होता. त्याचे पुस्तक तिने मला दिलेले. त्यातले पाहुन खालिल क्रिम्स केली आणि ती बरीच उपयोगी ठरताहेत हे लक्षात आले.
१. ५० मिलि अलोवेरा जेलमध्ये खालील तेले घालावीत -
रोसमेरी तेल ८ थेंब
जेरॅनियम तेल १२ थेंब
जुनिपर तेल १० थेंब
लेमन तेल ८ थेंब
बदाम तेल ५ मिलि
अवोकॅडो तेल ५ मिली
जेल लहान टोपात काढुन घ्यावा, त्यात वरील तेले घालुन लहान रवीने किंवा चमच्याने चांगले घुसळावे. २०-२५ मिनिटे घुसळल्यावर पारदर्शक जेल पांढरा होतो आणि हाताला एकदम मऊ लागतो. परत त्याच डबीत भरुन ठेवावे आणि आंघोळ केल्यावर हात्-पाय्-तोंड्-मान-गळा-ओठ इथे लावावे. त्वचेत जिरते, त्वचा हाताला मऊ व गुळगुळीत लागते. चेहरा अजिबात तेलकट दिसत नाही. यावर नेहमीची पावडर लावावी. हे सनस्क्रिनसारखेही काम करते.
२. ५० ग्र कुकुंबर जेलमध्ये खालील तेले
पहिल्या दिवशी चेहरा पुसल्यावर हवे तर अलोए क्रिम लावा. कुकुंबर क्रिम खुप इफेक्टिव आहे. याने माइल्ड ब्लिच होते. दोन्-तिन रात्री सतत वापरल्यास चौथ्या रात्री चेहरा पुसताना ब्लॅकहेड्सपण आपोआप निघताहेत असे लक्षात येईल.
लेमन तेल १२ थेंब
जुनिपर तेल १० थेंब
मार्जोराम तेल ८ थेंब
कॅरट तेल ५ मिली
ग्रेपसिड तेल ५ मिलि
वरच्यासारखेच क्रिम करावे. झोपण्याआधी विस मिनिटे ह्या क्रिमने तोंड-गळा-मान इथे हलका मसाज करावा. ह्याने मात्र चेहरा तेलकट दिसतो. २० मिनिटांनी फक्त पाण्याने धुवावे (नो साबण), टोवेलने पुसावे आणि शांत झोपावे. पहिल्या दिवशी जरा झोंबेल, दुस-या दिवशी थोडे कमी झोंबेल आणि मग सवय होईल.
३. रुक्ष त्वचेसाठी -
चंदन तेल १० थेंब
जेरॅनियम तेल १० थेंब
रोजवुड तेल ५ थेंब
येलँग यॅलंग तेल ५ तेल
व्हीटजर्म तेल १० मिली
हे सगळे ५० मिली तिळाच्या तेलात मिसळावे आणि जरुर तेवढे घेऊन संध्याकाळी तक्रारीच्या जागी मसाज करावा.
४. दिवसा आर्द्रतेसाठी -
कॅमोमाईल तेल ४ थेंब
चंदन तेल ६ थेंब
रोज तेल ६ थेंब
५० मिलि बदामतेलात मिसळुन आंघोळीनंतर चेहरा मान गळा इथे लावावे.
मी १ आणि २ बनवले. १. तीळाच्या तेलातही बनवता येते. मी १०० ग्र/मिली चा डब्बा आणलाय. १०० मिलीसाठी थेंबांचे प्रमाण दुप्पट करावे. एखादे तेल असले/नसले तरी चालते. फॉर्मुल्यात नसले तरी मी व्हीटजर्म तेल (५० मिली जेलला ५ मिली) वापरते कारण ते सुरकुत्या घालवुन त्वचा तरुण ठेवते. यावेळी चंदन तेल आणलेय. ते उष्णता कमी करते (रु ३००/५ मिली. ५० मिली जेलमध्ये ६ थेंब)
गरोदरपणी यातली काही तेले वापरु नयेत असे लिहिलेय. तसेच हि तेले थेट त्वचेवर लाऊ नये. तीळाच्या तेलात्/जेल/ किंवा इतर तेलात मिसळुन वापरावीत.
५० मिली जेलसाठी साठी सगळी इसेंसियल तेले मिळून ३०-४० थेंबांवर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. १००मिली साठी प्रमाण दुप्पट.
धन्यवाद ग साधना.... ते पुस्तक
धन्यवाद ग साधना.... ते पुस्तक बाहेर मिळु शकेल का?? नाव काय आहे?
तै, ऑर्डर घ्या. थंडीत
तै, ऑर्डर घ्या.
थंडीत हाताच्या कोपरांची वाट लागते. लिंबाची साल घासण्याव्यतिरीक्त उपाय सुचवा.
मला नाही वाटत बाहेर मिळेल
मला नाही वाटत बाहेर मिळेल म्हणुन. नाव अरोमाथेरपी कोर्स मटेरिअल. इश्शुड बाय डॉ. उर्जिता जैन'स वनौषधी केंद्र.
उर्जिता जैनची वेब्साईट नाहीये. धुंडाळले तेव्हा खालील माहिती मिळाली. तिथे विचार
Company Name:
Dr. Jain's Forest Herbals Private Limited
Contact Person: Mr. Chetan Kumar Jain
Telephone: +(91)-(22)-29201697/29202353/29203118
Fax No: +(91)-(22)-29201441
Address: A10, Raj Industrial Complex, Military Road, Marol, Andheri, (East), Mumbai, Maharashtra - 400 059 (India)
काय वाट लागते गं? पांढरे
काय वाट लागते गं? पांढरे पडतात? मी सगळ्या प्रश्नांवर अलोए जेल फासते
१० वर्षांपुर्वी एकदा मुलीला घेऊन जैनच्या क्लिनिकमध्ये गेले होते. तेव्हा तिने औषधांबरोबर living with herbs म्हणुन एक पुस्तिका दिली होती. त्यातही खुप फोर्मुले आहेत् ,माहिती आहे. तिने हे फोर्मुले वापरा, इतरांना वापरायला द्या आणि वनौषधींचा प्रसार करा असा सल्ला दिलाय.
बेबे ऑर्डरी घ्यायला सुरवात
बेबे ऑर्डरी घ्यायला सुरवात कर... साईडबिझनेस..
ओर्डरी द्या म्हणजे मी घेते
ओर्डरी द्या म्हणजे मी घेते
नविन धागा काढायला नको म्हणुन
नविन धागा काढायला नको म्हणुन ईकडेच प्रश्न विचारते.
माझी त्वचा खुप नाजुक आहे, टेक्ष्चर नॉर्मल आहे . आजवर कधीच फेशीअल किंवा काहीच केले नाही पण आता फेशीअल करावेसे वाटतेय, सो थंडीत त्वचा कोरडी होऊ नये अन ग्लो यावा यासाठी कोणते फेशीअल चांगले?
पार्लरवालीने बरेच पर्याय सुचविलेय पण कळत नाहीये कोणते करु.
अजुन एक, तीने मला सांगीतले की फेशीअल सोबत ब्लिच पण केले की चांगले पण मुळात माझा रंग गोरा आहे तर ब्लिच करणे गरजेचे आहे का?
ब्लिच केल्यावर स्किन काळवंडते
ब्लिच केल्यावर स्किन काळवंडते. उन्हात लवकर टॅन होते. (मी स्वतः एकदाही ब्लीच/ फेशिअल केलेले नाही पण माझ्या आईच्या बाबतीत तरी हे झाल आहे.)
घरच्या घरी मी चेहर्याला castor oil लावुन 5 मि मसाज करते. आणि 15 मि तसच ठेवते. कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करते.. पिंगमेंटेशन असेल तर जाते. छान ग्लो देखिल येतो.
कुणाला dark circle वर उपाय माहिती असेल तर प्लीज सांगा. पुरेशी झोप नसल्याने झाले आहेत..
कुणी BARVA ब्रॅन्ड चे
कुणी BARVA ब्रॅन्ड चे प्रॉडक्ट वापरले आहेत का?
मी lipstick आणि Foundation
मी lipstick आणि Foundation वापरते. मला आवडले.
ओके. धन्यवाद.
ओके. धन्यवाद.
मी मँगो बटर मॉइश्चरायाझर मागवलं आहे. बीबी क्रीम आणि फाउंडेशन पण मागवायचं आहे.
मी काही महिन्यापासून
मी काही महिन्यापासून Isotretinoin वर असल्याने आधीच सर्व स्किन कोरडी पडली होती त्यात आता थन्डी सुरु झालीये.
माझी कॉम्बिनेशन स्किन असल्याने ट्रायल अँड एरर मेथडने मला सुटेबल प्रॉडक्ट शेवटी घावले. मॉइश्चरायाझर बरोबर सन्स्क्रिनसुद्धा महत्वाचे आहे. physiogel-calming-relief-ai-lotion हे सर्व प्रकारच्या स्किनला सूट होते आणि सनस्क्रीनसाठी ipca acno uv gel वापरतो.
बाकी स्किन रुटीनमध्ये कुंकुमादी तेल, कामा रोजवाटर, पिक्सि ग्लो टॉनिक , मेलानो व्हिटॅमिन सि सिरम , सेरावे क्लीन्सर आणि कोजीक ऍसिड- अर्बुटीन वाली क्रिम वापरतो. आता टकाटक आहे चेहरा.
बापरे! एवढं सगळं कधी कसं
बापरे! एवढं सगळं कधी कसं वापरता?
मला तर बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावायचा पण कंटाळा येतो.
बापरे! एवढं सगळं कधी कसं
बापरे! एवढं सगळं कधी कसं वापरता?
मला तर बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावायचा पण कंटाळा येतो.>>>>>> +१.
असेल आवड तर होईल सवड
असेल आवड तर होईल सवड
(माझी १० ते ६ नो किटकिट लेडबॅक सरकारी नोकरी आहे सो सगळ्याच छंदांना वेळ मिळतो तसा मला)
माझी बहीण मोठी स्किनकेअर ऍडिक्ट असल्याने तिच्याकडे जगभरातील प्रॉडक्ट्सचा "खजिना" आहे. ती कायम हे प्रोडक्टस वापरण्यासाठी माझ्यामागे लकडा लावायची पण मी ही बिनकामाची फालतुगिरी आहे असे समजून टाळायचो. पण करोना लोकडाऊन सुरु झाल्यावर मी ते शेवटी मनावर घेतले. प्रोडक्टस तर होतेच आधीपासून पडून आणि कसे वापरायचे ते तिने सांगितले. मग काही काळाने मला ते खरोखर उपयोगी वाटले आणि फरकही दिसून आला. आता सवय झालीये आपोआप AM /PM रुटीनची. कॉम्प्लिमेंटसही मिळाल्या लोकांच्या फरक झाल्याच्या. त्यातील आधीचे दोन प्रोडक्टस माझे मी शोधलेत बाकी फ्री मिळालेत तिच्याकडून.
ह्याचा उपयोग झाला/होतोय - https://www.reddit.com/r/IndianSkincareAddicts/
Pages