अनुभूतींच्या शिंतोड्यांनी आग विझवलेली आहे
Submitted by बेफ़िकीर on 31 December, 2012 - 06:28
अनुभूतींच्या शिंतोड्यांनी आग विझवलेली आहे
निरिच्छ करुनी व्यक्तित्वाला झोप उडवलेली आहे
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच कळेना... त्यात पुन्हा
माझी माझ्याशी असलेली शिवण उसवलेली आहे
वळणावरती खिन्नपणे मी दिसेल त्याला विचारतो
वाट कोणती त्याची ज्याने वाट वळवलेली आहे
माझ्या हृदयी रहदारीचा नियम कुणीही पाळेना
हल्ली मी येण्याजाण्याची वेळ ठरवलेली आहे
एकांताचा शोध घ्यायला स्वतःत हिंडावे आता
जेथे जातो तेथे वस्ती नवी वसवलेली आहे
त्याने माझा क्लास लावला होता हे समजेल तुला
रडण्याची हातोटी ज्याने तुला शिकवलेली आहे
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गंमत असते
विषय: