Submitted by बेफ़िकीर on 31 December, 2012 - 06:28
अनुभूतींच्या शिंतोड्यांनी आग विझवलेली आहे
निरिच्छ करुनी व्यक्तित्वाला झोप उडवलेली आहे
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच कळेना... त्यात पुन्हा
माझी माझ्याशी असलेली शिवण उसवलेली आहे
वळणावरती खिन्नपणे मी दिसेल त्याला विचारतो
वाट कोणती त्याची ज्याने वाट वळवलेली आहे
माझ्या हृदयी रहदारीचा नियम कुणीही पाळेना
हल्ली मी येण्याजाण्याची वेळ ठरवलेली आहे
एकांताचा शोध घ्यायला स्वतःत हिंडावे आता
जेथे जातो तेथे वस्ती नवी वसवलेली आहे
त्याने माझा क्लास लावला होता हे समजेल तुला
रडण्याची हातोटी ज्याने तुला शिकवलेली आहे
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गंमत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे
-'बेफिकीर'!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली
आवडली
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच कळेना... त्यात पुन्हा
माझी माझ्याशी असलेली शिवण उसवलेली आहे>>> व्वा!!!
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गंमत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे>>> खुप सुंदर!!!
आवडली गज़ल. तुमच्यासारख्या अनुभवी गज़लकाराच्या रचनेचं मी कौतुक करणं हास्यास्पद वाटेल कदाचित. पण तरीही मनापासुन आवडतात तुमच्या रचना. धन्यवाद!
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच कळेना... त्यात पुन्हा
माझी माझ्याशी असलेली शिवण उसवलेली आहे........वाह..
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गंमत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे.... मस्त..
एकंदर चांगली आहे गझल.
सुंदर धन्यवाद!
धन्यवाद!
बेफिकीरजी, अनाहूत मताबद्दल
बेफिकीरजी,
अनाहूत मताबद्दल प्रथम क्षमस्व! पण एक प्रामाणिक मत - आतापर्यंतच्या वाचनावरून तुम्ही अत्यंत ताकदीचे गझलकार आहात, हे नि:संशय; पण कधी कधी तुमची कविता गझलेच्या चौकटीत घुसमटते आहे, तिचं बोन्साय सारखं काहीसं होतंय, असं वाटतं. ह्या चौकटीचाच आग्रह न धरल्यास तुमची समृद्ध प्रतिभा अधिकच बहरेल, असा मला विश्वास वाटतो. विचार करून पहा. ह्या अभिप्रायामुळे मी आपल्याला जराही दुखवले असेल, तर पुनःश्च माफी मागतो.
आपल्या कवितेचा एक सच्चा चाहता रसिक
बेफी, एकदम ग्रेट....
बेफी,
एकदम ग्रेट....
छान....
छान....
फारच छान!
फारच छान!
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच कळेना... त्यात पुन्हा
माझी माझ्याशी असलेली शिवण उसवलेली आहे....... आहा!!
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गंमत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे.... वा वा वा....अफलातून खयाल
बेफिकीर, मला गझलेतलं काही कळत
बेफिकीर,
मला गझलेतलं काही कळत नाही. एक वाचक म्हणून रचना आवडली. अधिक काय सांगणार!
का कुणास शोधीत भिरभिर फिरशी रे बेफिकीरा
ज्या वल्लीने व्यथांची गुरूकिल्ली मिळवलेली आहे
आ.न.,
-गा.पै.
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गंमत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे
व्वा व्वा!!
सुंदर गझल..!! मात्र...
माझ्या हृदयी रहदारीचा नियम कुणीही पाळेना
हल्ली मी येण्याजाण्याची वेळ ठरवलेली आहे
या शेरात... रहदारीचा नियम आणि येण्याजाण्याची वेळ यांचा मेळ बसत नाही असे वाटते. वेळ च्या ऐवजी स्त्रीलिंगी काफियामुळे मार्गही बसणार नाही. क्लास वापरलेच आहेत, तर लेनही चालू शकेल असे वाटते.
काफियातील 'ले' अक्षर नसते तरी
काफियातील 'ले' अक्षर नसते तरी चालले असते असे वाटून गेले!.............वै.म.
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच कळेना... त्यात पुन्हा
माझी माझ्याशी असलेली शिवण उसवलेली आहे >> व्वाह!!
एकांताचा शोध घ्यायला स्वतःत हिंडावे आता
जेथे जातो तेथे वस्ती नवी वसवलेली आहे >> सुरेख!
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गंमत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे >> हासिल ए गझल
सुरेख!
रडण्याचा क्लास नाही आवडला.
>> माझ्या हृदयी रहदारीचा नियम
>> माझ्या हृदयी रहदारीचा नियम कुणीही पाळेना
हल्ली मी येण्याजाण्याची वेळ ठरवलेली आहे
एकांताचा शोध घ्यायला स्वतःत हिंडावे आता
जेथे जातो तेथे वस्ती नवी वसवलेली आहे >>
एक वेगळा ताल जाणवला रचनेत,नेहमीची अर्थमयता.
पु.ले.शु.
सुंदर
सुंदर
अप्रतिम
अप्रतिम
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच कळेना... त्यात पुन्हा
माझी माझ्याशी असलेली शिवण उसवलेली आहे
एकांताचा शोध घ्यायला स्वतःत हिंडावे आता
जेथे जातो तेथे वस्ती नवी वसवलेली आहे
व्वा व्वा!
एकांताचा शोध घ्यायला स्वतःत
एकांताचा शोध घ्यायला स्वतःत हिंडावे आता
जेथे जातो तेथे वस्ती नवी वसवलेली आहे
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गंमत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे
फारच सुंदर शेर.
गझल आवडली. परस्परविरोधी ओळी
गझल आवडली.
परस्परविरोधी ओळी विचार करायला लावतात.
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच
कशापासुनी सुट्टे व्हावे हेच कळेना... त्यात पुन्हा
माझी माझ्याशी असलेली शिवण उसवलेली आहे
वळणावरती खिन्नपणे मी दिसेल त्याला विचारतो
वाट कोणती त्याची ज्याने वाट वळवलेली आहे
its amazing
फारच छान ! प्रतिमा, आशय व
फारच छान ! प्रतिमा, आशय व शब्द यांचा सुरेख त्रिवेणी संगम !!
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात
मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गंमत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे >>> व्वा व्वा सुरेख
मला लय थोडी जड गेली गझलची