मला न्यूरोसर्जनने जेव्हा ऑपरेशनसाठी टेबलवर घेण्याची तारीख जाहीर केली त्याच्या आधल्या रात्री रूममध्ये एक नाभिक आपली अवजारे घेऊन आला आणि माझे सर्वांग नापिक करून टाकले. "पहाटे भूलतज्ज्ञ येतील आणि तुमचे बीपी तपासतील..." असे त्याच्याबरोबर असलेल्या हॉस्पिटलच्या असिस्टंटने सांगितले. मी रात्रभर विचार करत पडलो की कसला असेल हा भूलतज्ज्ञ ? कारण या अगोदर कधीच असल्या खास व्यक्तीची गाठ पडली नव्हती किंबहुना असल्या तज्ज्ञाचे नाव असलेला दवाखानाही कधी पाहिला नव्हता.
'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर येते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे.