बघ जरासा
तिचा प्रियकर तिचा जराही विचारच करत नाहीये, आणि तिची फक्त एकच अपेक्षा आहे की, त्यानं तिला समजून घ्यावं. म्हणून ती म्हणतेय की
तो दुअर्थ बघ जरासा
मी होऊन बघ जरासा
वाटे हवी मज साथ अन तू
जवळून बघ जरासा
मोहित मी तुला अन
तू होऊन बघ जरासा
जे सांगून टाकलेले
समजून बघ जरासा
आता पिसाटलेले
आवरून बघ जरासा
रंगीत लगाम त्याची
आवळून बघ जरासा
आहे तुझीच मी जर
जा थांबुन बघ जरासा
दुसऱ्या जगात माझ्या
हरवून बघ जरासा