'रतनगड' :सह्याद्रीचे आभुषण !
Submitted by Yo.Rocks on 5 November, 2012 - 21:32
पावसाळ्यातील आहूपे घाटाचा ट्रेक झाल्यानंतर मोठ्ठा ब्रेक होता.. गणेशोत्सव, नवरात्री झाली.. नि आम्हाला वेध लागले पुढच्या ट्रेकचे.. खरे तर ऑक्टोबर हिट मध्ये ट्रेक करण्यासाठी नाक मुरडतोच.. पण संध्याकाळची थंड हवा जाणवू लागली नि साहाजिकच गडावरची रात्र आठवू लागली.. ही ओढ वाढत असतानाच विन्याने 'हरिश्चंद्रगड नाळीच्या वाटेने' या ट्रेकचा नारा सुरु केला.. नि मागे- पुढे करता करता दिवस ठरला.. २७-२८ ऑक्टोबर.. नेहमीच्या येणार्या मायबोलीकरांना कळवले.. सगळे राजी झाले..
शब्दखुणा: