पासपोर्ट
पासपोर्ट
मी आताच पासपोर्ट रिनिव करुन घेतलाय... माझा आणि माझ्या दोन मुलीचा ... तर आता परदेशी जातांना मला जुना पासपोर्ट पन सोबत ठेवावा लागेल का... कारण मोठ्या मुलीचा हा तिसरा आणि धाकटीचा दुसरा आनि माझा पण दुसरा पासपोर्ट आहे... आणि एवढे पासपोर्ट बाळगायचे म्हण्जे फार कट्कटीचे काम वाट्ते.... कुणाला ह्याबद्द्ल माहीत आहे का ?
भारतातील सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे, प्रक्रिया व नियम
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सरकारी ओळखपत्रे हरघडी लागत असतात. या सगळ्या ओळखपत्रांच्या बाबत प्रक्रिया आणि नियम यांचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे. प्रत्येकाने आपला अनुभव (प्रक्रियेसंदर्भाने) लिहावा.
कुणाला किती पैसे चारल्यास किती लवकर काम होईल इत्यादी गोष्टींची चर्चा न केल्यास बरे.
अश्या प्रकारचा धागा असेल तर प्लीज हा उडवावा.
सरकारी कागदपत्रे असा वेगळा ग्रुप सुरू करून भारतीय आणि वेगवेगळ्या देशांतर्गत लागणारी सर्वप्रकारची सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे यासाठी वेगवेगळे धागे केल्यास सापडायला अजून सोपे पडेल.