मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळाची मुंबईतील तिकिटे मायबोलीकरांसाठी उपलब्ध आहेत. या शुभारंभाच्या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्यांनी chinmay@maayboli.com या पत्त्यावर इमेल पाठवावी.
इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा. एका मायबोलीकराला एकच तिकीट दिलं जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. चिन्मयचा फोन नंबर- ०९९७०८४२४०५
'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळासाठी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
खेळाचे तपशील पुढीलप्रमाणे-
एक चतुरस्र व सशक्त अभिनेत्री अशी श्रीमती उत्तरा बावकर यांची ओळख आहे. 'दोघी', 'उत्तरायण', 'बाधा', 'नितळ', 'वास्तुपुरुष', 'हा भारत माझा', 'एक दिन अचानक' अशा असंख्य हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. मात्र उत्तराताईंच्या अभिनय-कारकिर्दीला सुरुवात झाली ती दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य-महाविद्यालयापासून.
उत्तराताईंची महत्त्वाची भूमिका असलेला 'संहिता' हा चित्रपट येत्या १८ तारखेला प्रदर्शित होतो आहे.
या निमित्तानं उत्तराताईंनी त्यांच्या कलाकिर्दीविषयी लिहिलेला खास लेख.
एक चित्रपट दिग्दर्शिका.
एक निर्मात्री.
एक लेखिका आणि एक अभिनेत्री.
या दिग्दर्शिकेला एक संहिता लिहायची आहे.
पण या संहितेचा शेवट कसा असावा?
आपली संहिता आपल्याला लिहिता येते का?
या चौघींना आपल्या संहितेचा सुखांत करता येईल का?
सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स व अशोक मूव्हीज प्रा. लि. यांच्या सहकार्यानं सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या विचित्र निर्मिती या संस्थेनं 'संहिता'ची निर्मिती केली आहे.
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला असून दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं या चित्रपटानं पटकावली आहेत.
आज जाहीर झालेल्या साठाव्या राष्ट्रीय चित्रपटपुरस्कारांत मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
'अनुमती' या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटासाठी श्री. विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
'संहिता' या सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटातील संगीतासाठी श्री. शैलेंद्र बर्वे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.
मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हींग इमेजतर्फे आयोजित केलेल्या १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तीन चित्रपटांची निवड झाली आहे. हे तिन्ही चित्रपट 'इंडिया गोल्ड' या स्पर्धाविभागात दाखवले जातील.