आले बाप्पा मोरया रे ...
Submitted by पुरंदरे शशांक on 17 September, 2012 - 01:33
गंमत जम्मत
धमाल की रे
आले बाप्पा
मोरया रे
तामणात का
पाटावरती
मिरवत आले
मोरया रे
चकाचक हे
घर झाले रे
सजले सारे
मखर पुन्हा रे
फुले नि दुर्वा
आणू या रे
मोदक सुंदर
वा रे वा रे
मंत्र स्तोत्रे
पाठ करु रे
करु आरती
मिळूनी सारे
नकला गाणी
किती किती रे
नाटुकले पण
हवेच की रे
उत्सव मोठा
बाप्पांचा रे
नवलाईचे
दहा दिवस रे
असेच न्हेमी
येत रहा ना
गणपती बाप्पा
मोरया रे
मोरया रे मोरया रे....
शब्दखुणा: