कलाकाराचे नाव - सानिका
पालकाचा आयडी - तोषवी
'सुंदर माझा बाप्पा' उपक्रमासाठी मी चित्र काढायला घेतलं तेव्हापासूनच सानिकाला त्याला सजवायचं होतं. मग काय तिच्या ट्रेझर बॉक्स मधील ठेवणीतला खजिना बाहेर काढला आणि तिने तिच्या बाप्पाला सजवलं!
"ए आई, मला पण बाबाला मदत करायची आहे; बाप्पाची आरास करायला!"
दोस्तांनो, गणपतीची आरास करायला आवडते ना? मग इथे तर तुम्हाला प्रत्यक्ष बाप्पालाच सजवायचंय!
चला तर मग...
१) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलामुलींकरता आहे.
२) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
३) गणपती बाप्पाच्या दिलेल्या चित्राची प्रत (प्रिंटआउट) काढायची आहे.