लंडन २०१२

सर्वोकृष्ट `रिअ‍ॅलिटी शो’

Submitted by ललिता-प्रीति on 15 August, 2012 - 23:34

महिलांच्या पळण्याच्या कुठल्यातरी शर्यतीची (बहुतेक ४०० मीटर्स) एक प्राथमिक फेरी चालू होती. शर्यत सुरू होताच प्रेक्षकांचा सुरू झालेला गोंगाट हळूहळू वाढत गेला. स्पर्धक महिलांनी एक एक करून अंतिम रेषा ओलांडली. एकमेकींचं अभिनंदन केलं. ज्यांनी पात्रता निकष पूर्ण केले होते त्यांना कॅमेरावाल्यांनी घेराव घातला. शर्यत पूर्ण होताच प्रेक्षकांचा टिपेला पोहोचलेला टाळ्यांचा गजर थोडासा कमी झाला आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू झाला. आधी वाटलं, प्राथमिक फेरीतच एखादं रेकॉर्ड वगैरे मोडलं गेलं की काय; ते प्रेक्षकांच्या उशीराने लक्षात आलं की काय. पण नाही. कारण निराळंच होतं.

शब्दखुणा: 

टेबल टेनिस

Submitted by ललिता-प्रीति on 2 August, 2012 - 03:34

इंद्रधनुष्य याच्या विनंतीवरून त्याने पाठवलेला मजकूर इथे पोस्ट करत आहे. Happy

---------------------------

१९व्या शतकापासून खेळल्या जाणार्‍या टेबल टेनिस या खेळाला राजाश्रय मिळाला तो उच्चभ्रूंच्या 'After-Dinner' मुळे. विजेच्या चपळाईने खेळल्या जाणार्‍या या खेळाला शारिरीक कुशलतेसोबत मिश्र डावपेचांची साथ लागते. सराईत खेळाडू एका सेकंदात २ ते ३ वेळा चेंडू टोलवण्याचे कसब दाखवतो.

टेबल टेनिसचा चेंडू आतून पोकळ असतो. celluloid पासून बनविलेल्या चेंडूचे वजन साधारण २.७ ग्रॅम भरते.

१२ दिवस १७२ खेळाडू ४ सुवर्ण पदके.

शनिवार २८ जुलै ते रविवार ८ ऑगस्ट

ठिकाण : ExCeL लंडन.

जलतरण

Submitted by ललिता-प्रीति on 27 July, 2012 - 06:29

८ दिवस, ९०० स्पर्धक, ३२ सुवर्णपदके

- इ.स. १९०० मधील पॅरीस इथल्या ऑलिंपिक खेळांच्या वेळेस जलतरणाच्या स्पर्धा सीन नदीत भरवण्यात आल्या होत्या. १९०८ सालच्या लंडन ऑलिंपिक्समधे प्रथमच तरणतलावाचा वापर करण्यात आला. १९१२ सालच्या स्टॉकहोम ऑलिंपिक्समधे प्रथम महिला जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

- १९०० सालच्या पॅरीस गेम्सच्या वेळेसच Underwater Swimmingच्याही स्पर्धा घेण्यात आल्या. खेळाडू जितका वेळ आणि जितके अंतर पाण्याखाली राहू शकेल, त्यानुसार त्याला गुण बहाल केले जात.

शब्दखुणा: 

फुटबॉल

Submitted by ललिता-प्रीति on 27 July, 2012 - 02:04

१३ दिवस, ५०४ खेळाडू, २ सुवर्णपदके

- १९०४ साली पॅरीस इथे झालेल्या ऑलिंपिकमधे फुटबॉलचा प्रथम समावेश करण्यात आला. त्यापश्चात प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत हा खेळ खेळवला गेला, अपवाद १९३२ सालच्या लॉस एंजल्स येथील स्पर्धेचा.
महिला फुटबॉलचा समावेश सर्वप्रथम १९९६ सालच्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक स्पर्धांच्या वेळी करण्यात आला.

- एका सामन्यात ११-११ खेळाडूंचे दोन संघ एकमेकांशी झुंजतात. प्रत्येक संघाकडे ७ बदली खेळाडू असतात, जे मैदानातील खेळाडूची जागा घेऊ शकतात.

Subscribe to RSS - लंडन २०१२