इंद्रधनुष्य याच्या विनंतीवरून त्याने पाठवलेला मजकूर इथे पोस्ट करत आहे.
---------------------------
१९व्या शतकापासून खेळल्या जाणार्या टेबल टेनिस या खेळाला राजाश्रय मिळाला तो उच्चभ्रूंच्या 'After-Dinner' मुळे. विजेच्या चपळाईने खेळल्या जाणार्या या खेळाला शारिरीक कुशलतेसोबत मिश्र डावपेचांची साथ लागते. सराईत खेळाडू एका सेकंदात २ ते ३ वेळा चेंडू टोलवण्याचे कसब दाखवतो.
टेबल टेनिसचा चेंडू आतून पोकळ असतो. celluloid पासून बनविलेल्या चेंडूचे वजन साधारण २.७ ग्रॅम भरते.
१२ दिवस १७२ खेळाडू ४ सुवर्ण पदके.
शनिवार २८ जुलै ते रविवार ८ ऑगस्ट
ठिकाण : ExCeL लंडन.
कोर्टची लांबी-रुंदी १८मी. X ९मी. असते. तर टेबलची लांबी-रुंदी २.७४ मी. X १.५२५मी. असते. टेबलची उंची जमिनीपासून ७६ सेमी. असते. टेबलच्या मधोमध असलेले १५.२५सेमी. उंचीचे जाळे टेबलची दोन भागात विभागणी करते.
- टेबल टेनिस या खेळाचा पाया मुळात टेनिस या खेळावर आधारलेला असला, तरी तो गुण मोजणीच्या फरकामुळे मजेशीर बनला आहे.
- एकेरी पद्धतीत सर्विस करताना चेंडू जाळ्याच्या अलिकडे आणि पलिकडेही अश्या पद्धतीने मारला जातो जेणेकरून तो प्रतिस्पर्ध्याला परतवता येणार नाही.
- सर्विसनंतर केवळ प्रतिस्पर्ध्याच्याच टेबलवर चेंडूचा टप्पा पडेल अश्या पद्धतीने खेळावे लागते.
- दुहेरी पद्धतीत सर्विस करताना चेंडू समोरील प्रतिस्पर्ध्याकडे न मारता समोरील डावीकडील प्रतिस्पर्ध्याकडे (म्हणजे तिरकी सर्विस) मारला जातो.
- टेनिसप्रमाणे इथे जोडीदाराला कोणताही चेंडू परतवण्याची मुभा नसते. सर्विस केल्यानंतर आपल्या जोडीदाराला प्रतिस्पर्ध्याचा चेंडू टोलवण्यासाठी जागा करुन द्यावी लागते. म्हणजेच एकच खेळाडू लागोपाठ चेंडू परवू शकत नाही, तर प्रत्येकाने आलटून पालटून चेंडू परतवायचे असतात. (In Doubles matches, players take turns to hit the ball, with one hit each before alternating.) अश्या या थोड्याश्या किचकट नियमामुळेच टेबल टेनिसचे दुहेरीचे सामने बघायला आणि खेळायला फार मजा येते.
- एकेरी आणि दुहेरी दोन्ही मॅच बादफेरीच्या असतात.
- एका Team मधे ३ खेळाडू असतात. प्रत्येक खेळाडूला ४ एकेरी मॅचेस आणि १ दुहेरी मॅच खेळावी लागते. Best of Five मधे तीन मॅच जिंकणारी Team विजयी घोषित केली जाते.
- चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीचे सामने खेळतात. त्यातून दोन अंतिम फेरीत जातात. अंतिम विजेत्याला सुवर्ण पदक मिळते. उपविजेत्याला रजत पदक मिळते. उपांत्य फेरीत हरलेले दोन खेळाडू / संघ एकमेकांशी सामना खेळतात आणि त्यातल्या विजेत्याला कांस्य पदक मिळते.
- आपण मारलेल्या चुकीच्या फटक्यांमुळे जाणारे गुण :
१. सर्विसचा पहिला टप्पा आपल्या व दुसरा टप्पा प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात मारला नाही तर.
२. बॉल जाळ्यात अडकला तर.
२. बॉल टेबलच्या बाहेर पडला तर.
- पॉईंट मोजण्याची पद्धत
१. एकेरी मॅचमधील गेम प्रत्येकी ११ पॉईंटचा (जिंकण्यासाठी दोन गुणांचा फरक आवश्यक) असतो. मॅचचा निकाल Best of Seven गेम वर लागतो.
२. एकेरीच्या सामन्यात प्रत्येक दोन गुणांनंतर सर्विस बदलते. तसेच जर गेम मधे १०-१०ची बरोबरी झाली, तर प्रत्येक गुण घेतल्यानंतर सर्विस बदलते. दुहेरीच्या सामन्यात जर बरोबरी झाली, तर प्रत्येक गुणांनतर प्रत्येक खेळाडूला सर्विस कारावी लागते.
अवांतर
- रॅकेटच्या दोन्ही बाजूला रबराचे आवरण असते. पैकी टणक भाग चेंडू परतवण्यासाठी वापरतात.
- प्रत्येक खेळाडू कडून Topspin, Cut, Gentle Push, Smash सारखे कौशल्य पणाला लावले जाते.
- चीन, कोरीयाचे काही खेळाडू रॅकेट पकडण्यासाठी Penhold पद्धतीचा अवलंब करतात.
- खेळाडू आणि संघांना मानांकन दिले जाते. सगळ्यात चांगला खेळाडू किंवा संघ प्रथम मानांकित असतो.
- मेडल्स
१. पुरूष एकेरी
२. महिला एकेरी
३. पुरुष दुहेरी
४. महिला दुहेरी
१९८८च्या ऑलिम्पिक मधे टेबल टेनिस या खेळाचा अंतर्भाव करण्यात आला. तेव्हापासून चीनने २४ पैकी २० वेळा सुवर्ण पदक जिंकले आहे.
http://www.london2012.com/table-tennis/about/index.html
http://www.ittf.com/
खेळायला पाटनर पाहीजे...
खेळायला पाटनर पाहीजे...