१३ दिवस, ५०४ खेळाडू, २ सुवर्णपदके
- १९०४ साली पॅरीस इथे झालेल्या ऑलिंपिकमधे फुटबॉलचा प्रथम समावेश करण्यात आला. त्यापश्चात प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत हा खेळ खेळवला गेला, अपवाद १९३२ सालच्या लॉस एंजल्स येथील स्पर्धेचा.
महिला फुटबॉलचा समावेश सर्वप्रथम १९९६ सालच्या अॅटलांटा ऑलिंपिक स्पर्धांच्या वेळी करण्यात आला.
- एका सामन्यात ११-११ खेळाडूंचे दोन संघ एकमेकांशी झुंजतात. प्रत्येक संघाकडे ७ बदली खेळाडू असतात, जे मैदानातील खेळाडूची जागा घेऊ शकतात.
- फुटबॉलच्या मैदानाची लांबी कमीतकमी १०० मीटर आणि जास्तीत जास्त ११० मीटर, तर रुंदी कमीतकमी ६४ मीटर आणि जास्तीत जास्त ७५ मीटर असते. पेनल्टीची जागा गोलपोस्टपासून बरोबर ११ मीटर अंतरावर असते.
- प्रत्येक सामना ४५ मिनिटांच्या दोन भागांत खेळवला जातो. रेफ्रीद्वारे शेवटी जास्तीचा वेळ दिला जाऊ शकतो. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिला, तर अतिरिक्त वेळेच्या प्रत्येकी १५ मिनिटांच्या दोन भागांत सामना पुढे खेळवला जातो. तरीही बरोबरी राहिली, तर पेनल्टी-शूटआऊटचा आधार घेतला जातो. प्रत्येक संघाला प्रत्येकी ५ पेनल्टीज् मिळतात. तरीही बरोबरी राहिली, तर विजेता ठरेपर्यंत पेनल्टी-शूटआऊट चालू ठेवले जाते.
- खेळाडूंपैकी केवळ गोलरक्षकालाच चेंडूला हाताने स्पर्श करण्याची परवानगी असते.
- पुरूष संघ आणि महिला संघ प्रत्येकी १ सुवर्णपदकासाठी झुंजतात. पुरुषांचे एकूण १६ संघ सहभागी होतात; तर महिलांचे १२ संघ असतात.
- प्रत्येक पुरूष संघातील बहुतेक खेळाडूंचे वय जास्तीत जास्त २३ वर्षे असावे लागते. दर संघामागे त्यापेक्षा अधिक वयाचे जास्तीत जास्त ३ खेळाडू सहभागी होऊ शकतात. महिला खेळाडूंसाठी वयाची कोणतीही अट नाही.
- पुरुषांचे संघ ४ गटांत विभागलेले असतात, तर महिलांचे संघ ३ गटांत विभागलेले असतात.
- सामना जिंकणार्या संघास ३ गुण मिळतात. सामना बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी १ गुण मिळतो. सामना हरणार्या संघास एकही गुण दिला जात नाही.
- पु्रुषांच्या प्रत्येक गटातले सर्वोकृष्ट २ संघ उपउपांत्य फेरीत प्रवेश करतात. महिलांच्या प्रत्येक गटातील सर्वोकृष्ट २ संघांसोबतच तिसर्या क्रमांकावरचे सर्वोकृष्ट २ संघही उपउपांत्य फेरीत प्रवेश करतात.
- उपउपांत्य फेरीचे चार सामने होतात. विजेते ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतात. उपांत्य फेरीतील २ विजेते अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी झुंजतात.
- अंतिम सामन्यांत पराभूत होणार्या संघाला रजतपदक बहाल केले जाते. उपांत्य फेरीत पराभूत होणार्या संघांमधे अजून एक सामना खेळवला जातो आणि विजेत्यास कास्यपदक बहाल केले जाते.
- आजवरच्या इतिहासात फक्त एकदाच अंतिम फेरीत विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊटच्या आधार घ्यावा लागला आहे. २००० सालच्या सिडनी ऑलिंपिकमधे पुरूषांच्या अंतिम सामन्यात कॅमेरूनने स्पेनला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले होते.
- लंडन येथील फुटबॉल स्पर्धेत एकूण २४०० बॉल वापरले जाणार आहेत.
- पुरूष आणि महिला विभागाचे दोन्ही अंतिम सामने वेंब्ली स्टेडियममधे खेळवले जाणार आहेत.
मूळ पीडीएफची लिंक - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/70...
फूटबॉल मध्ये महिला आणि पुरुष
फूटबॉल मध्ये महिला आणि पुरुष विभागात गटस्पर्धेतील पहिली फेरी पूर्ण झाली आहे..
बहुतेक निकाल अपेक्षित होते तसेच लागलेत पण पुरुष विभागात विश्वविजेत्या स्पेनच्या संघाला जपानच्या तुलनेने दुबळ्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. ब्राझीलला इजिप्तनी चांगली लढत दिली.. आणि ब्राझील ३-२ असे जिंकले तर इंग्लंडला सेनेगलविरुद्ध १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली.
इंग्लंडला सेनेगलविरुद्ध १-१
इंग्लंडला सेनेगलविरुद्ध १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली >>> हे ही जरा आश्चर्यकारकच आहे. पण तो २३ वर्षांचा नियम लक्षात घेता निकाल काहीही लागू शकतो.
इकडे स्केड्युल्स पण टाकणार का
इकडे स्केड्युल्स पण टाकणार का प्लीज. किंवा कुठे चेक करु?
मनिमाऊ - इथे चेक कर -
मनिमाऊ - इथे चेक कर -
http://www.london2012.com/schedule-and-results/
ललिता, थँक्स ! मस्त आहे ही
ललिता, थँक्स ! मस्त आहे ही लिंक. अर्जेंटिना डिसक्वालिफाय झाल्यामुळे माझा इंटरेस्टच गेला होता. पण तरीही आता मोह आवरत नाहीए. नाही तरी अर्जेंटिना असुनही मेस्सी खेळुच शकला नसता, म्हणुन मनाचं समाधान करुन घेतलं आहे.
बरं झाला हा धागा काढलास. परत एकदा आभार.
ललिता-प्रीति, धन्यवाद
ललिता-प्रीति, धन्यवाद
वर्ल्ड कपसारखी USA - Japan
वर्ल्ड कपसारखी USA - Japan अशी बायकांची फायनल आहे.
पुरुषांमध्ये ब्राझिल-कोरिया आणि मेक्सिको-जपान अशा सेमि. मी आधीच्या दोन मॅचेस पाहिल्या. ब्राझिलचा खेळ काही खास वाटला नाही.
कालची फ्रान्स - जपान मॅच जबरी
कालची फ्रान्स - जपान मॅच जबरी झाली... फ्रान्स पहिल्या हाफ नंतर २ - ० नी मागे होते आणि नंतर त्यांनी प्रच्म्द धडाका लावला होता.. १ गोल झाला सुद्धा.. दुसर्य गोल साठी खूप प्रयत्न केले. त्यात त्यांना पेनल्टी पण मिळाली पण त्यांच्या कॅप्टनची ती किक थोडक्यात गोल पोस्टच्या शेजारून गेली.. त्या नंतर सुद्धा त्यांनी खूपच प्रयत्न केले.. शेवटची २० मिनिटे फक्त फ्रान्स कडेच चेंडू होता.. जपान खेळाडू फक्त बचावाचे कार्य करत होते.. आणि त्यांनी ते योग्य रितीने पार पाडले.