दूरचे डोंगर वरुन साजरे!!!
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
50
०९ ऑगस्टला महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट म्हणजेच 'कळसूबाई' सर केला. धुक्याच्या पडद्याआड लपलेलं कळसूबाईचं शिखर काही केल्या दिसेना...
चला ट्रेकची सुरवात तर छान झाली...
पायथ्या खालील देवळातील एक भाविक...
शिखराकडे कूच करताना वाटेत भेटलेले सोबती...
शिखर नजरेच्या टप्प्यात येताना...
शिखरावरील कळसूबाई...
परतीच्या मार्गावरील ऊनसावलीचा खेळ...
डोंगराला सर्दी झाली... बघा... बघा... बघा...
आणि शेवटी जमिनीवर...
विषय:
प्रकार:
शेअर करा
सगळं हिरवंगार झालंय रे !
सगळं हिरवंगार झालंय रे ! वृत्तांत पण टाक की. कोणकोण गेला होतात?
छान
छान
अभिनंदन. सुंदर प्रकाशचित्र.
अभिनंदन.
सुंदर प्रकाशचित्र.
फार भारी!! हेवा वाटावा असं
फार भारी!! हेवा वाटावा असं निसर्गसौंदर्य आहे. झरा फार आवडला. फुलांचा फोटोही मस्त आलाय.
कॅमेरा कुठला वापरलाय?
मस्त रे.. इंद्रधनुष्याला
मस्त रे.. इंद्रधनुष्याला इंद्रधनुष्य भेटले तर एकदा. कसं जायचं वगैरे लिही की.. किती वेळ लागला..
हा फोटो माझ्या कडुन.......
हा फोटो माझ्या कडुन.......

बारी गावातून गेलात ना
बारी गावातून गेलात ना रे?
मीने, मुंबईहून नाशिकला जाताना, इगतपूरीच्या पुढे, भंडारधर्याच्या रस्त्यावर, बारी नावाच्या गावातून कळसुबाईला जाता येतं. पावसाळ्यात तिथे नजरबंदी होईल असं निसर्गसौंदर्य असतं.
इंद्रा, मस्त रे..

पुन्हा एकदा कळसुबाईच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल thanks..
आणि जाताना न सांगीतल्याबद्दल.... कधी भेटतोयस?
जरा डिटेलमधे लिवा की काय
जरा डिटेलमधे लिवा की काय नुसते फोटू डकवताय अन झब्बू देताय???
किरुभाऊ, तो रवीवारी गेला होता
किरुभाऊ, तो रवीवारी गेला होता
आपण मुळात वविला आलात हेच खूप झालं 
नंदिनीला अनुमोदन.
आणखी काही फोटो
मस्तच..
मस्तच..
अरे नुसते फोटू काय डकवताय..
अरे नुसते फोटू काय डकवताय.. एक फर्मास वृत्तांत पण डकवा...
लै भारी!
लै भारी!
लै भारी रे इंद्रा. फोटो पण
लै भारी रे इंद्रा. फोटो पण सुरेख आले आहे.
मस्तच रे ईंद्रा, निसर्ग
मस्तच रे ईंद्रा, निसर्ग खुणावतोय अगदी.
वा इन्द्रा मस्तच. पुढच्या
वा इन्द्रा मस्तच.
पुढच्या महिन्यात जाव का असा विचार मनात घोळतोय.
जरा डीटेल मन्दी माहिती दे.
मस्तच फोटो इंद्रा पण आता
मस्तच फोटो इंद्रा
पण आता डिटेल वार वृ. पण लिही की वेळ काढुन.
इण्द्रा खुपच अप्रतिम फोटोस,
इण्द्रा खुपच अप्रतिम फोटोस, वृ पण टाक की जरा
दोघांचीही प्रकाशचित्रे मस्त.
दोघांचीही प्रकाशचित्रे मस्त.
मस्त फोटो... वृ. पण टाका
मस्त फोटो... वृ. पण टाका रे.. निदान तेवढे तरी समाधान....
छान फोटो. त्या शिड्या अजून
छान फोटो. त्या शिड्या अजून आहेत का धड ? आणि वरची विहीर ?
मस्त फोटो. वर्णनात्मक चार
मस्त फोटो.
वर्णनात्मक चार शब्द खरडले असतेस तर की-बोर्ड झिजला असता काय रे तुझा?
वाह! अप्रतिम प्रचि!
वाह! अप्रतिम प्रचि!
धन्यवाद मंडळी... वाढत्या
धन्यवाद मंडळी...
वाढत्या मागणीचा विचार करून चारच शब्द खरडले आहेत...
ववि वरून परल्यावर दुसर्याच दिवशी 'आसमंत'चा 'कळसूबाई' ट्रेकसाठी ईमेल आला... खर तर मला कळसूबाईचा ट्रेक हिवाळ्यात करायचा होता... कारण पावसाळी दिवसांत वर धुकं आणि वारा या शिवाय काहीच मिळत नाही... त्यात आसमंत सोबत ५० जण असतात... त्यामुळे त्यांचा ट्रेक कमी आणि पिकनीक जास्त... म्हणून मी आधी नकार दिला... परंतू गिरीविहारच्या आग्रह पुढे नमते घेत मी ट्रेकला जाण्याचे नक्की केले...
इगतपूरी - घोटी मार्गे पहाटे ३.३०ला बारीला उतरलो... चतुर्थीच्या चंद्रप्रकाशात ओढ्या काढच्या विधी उरकण्यात काहीच अडथळा नव्हता... चहा-नाष्ट्याची सोय आसमंत तर्फे असल्यामुळे आम्ही फुरसत मधे होतो. पहाटे ६ वाजता चढाईला सुरवात केली. पावसाच्या कृपेने ओढ्यांना फारसे पाणी नव्हते. तरीपण हंटर हातात घेण्यातच मी धन्यता मानली... कारण पुढचा ट्रेक मला ओल्या पायांनी करायचा नव्हता...
वर धुक्याचं साम्राज्य पसरलं होत पण पाऊस रुसलेलाच होता... मात्र मुरुडमाती निसरडी करण्यात त्याने कसलीच कुचराई केली नव्हती... आमच्या सोबत काही पहिलटकर होते... त्यांच्यासाठी हा अनुभव जरा बेरकीच होता... त्यातील एक गलबत पायथ्याला असलेल्या मंदिरातच विसावलं... :p ओळख परेड घेऊन आम्ही पुढे निघालो... दुरून दिसणारा एक धबधबा आम्हाला आकर्षित करत होता... साधारण ७.३० च्या सुमारास पुर्वेच्या देवाचा तिरपा कटाक्ष आणि धबधब्याच्या मैत्रीमुळे आम्हाला इंद्रधनुष्याचं दर्शन झालं... प्रथमच इतक्या जवळून इंद्रधनुष्य पहाण्याची संधी मिळाल्यामुळे सगळे त्याला कॅमेर्यात टिपण्यात गुंतले...
साधारण १ तासाच्या चढाई नंतर पहिल पठार लागलं... तिथे ईडली-चटणी आणि राजगिर्याचे लाडू असा बेत आसमंतने योजिला होता... तेथून पुढे लोखंडी शिड्यांचा चढ चढायला सुरवात केली... प्रथम दर्शनी सोपा वाटणारा ट्रेक अचानक कठीण झाल्यामुळे नवोदितांचे थरथरणारे पाय लटपटू लागले... पायर्यांचा पहिला टप्पा पार केल्यावर एका टेकडीवर विसावा घेतला... समोरचा परिसर आणि उनपावसाच्या खेळाने मनाचा ताबा कधी घेतला हे कळलेच नाही... काय वर्णन करावे त्या नजार्याचे... हिरवा निसर्ग हा भवतीने... अह्हा... केवळ अप्रतिम
शिडी आणि पायर्यांचा अखेरच्या टप्प्याला आम्ही सुरवात केली... मनात म्हंटले चला हा टप्पा पार केला की सुटलो या तंगतोडीतून... पण तसे होणे नव्हते... पुढे धुक्यामुळे कळसुबाईच शिखर काही केल्या नजरेत येत नव्हतं... पायर्यां मागे टाकून अर्धा तास झाला तरी शिखराकडची पायपीट काही संपत नव्हती... खालच्या बाजूने कड्यावर येणारा आडवा पाऊस आणि थंडगार वारा अंगात हुडहूडी भरवत होता... पुढे गेलेल्या ग्रुप लिडरने पोहचल्याची इशारत केली तेव्हा आम्हाला हायसे वाटले... तब्बल ३.३० तासात केलेल्या चढाई नंतर शेवटी कळसूबाईच्या दर्शनाचा योग आला... शिखरावर २ - ३ गुंटे जागेत मातेने आपले वास्तव्य वसविले आहे... वर निवार्याची जागा मुळीच नसल्याने मी मंदिराच्या भिंतीचा आडोसा घेतला... बेफाम पाउस-वारा आम्हाला तेथे उभ राहू देत नव्हता...

अर्धा अधिक जणांची चढाई बाकी होती... आम्ही ग्रुप लिडरला पटवून खाली उतरण्यास सुरवात केली... आता तर खरी धमाल येणार होती... निसरड्या वाटेवरून न घसरता चालणे म्हणजे तारे वरची कसरत... खाली येताना पहिला पडाव विहिरी जवळ घेतला... थोड खाली येऊन शेवटच्या पठारावर... थालिपिठ, लिंबाच लोणचं, दोन चपाती आणि श्रीखंड असा 'कॅलरीज् गेन'चा कार्यक्रम पार पाडला...
भरल्या पोटी खाली उतरण्यास सुरवात केली... पायथ्याला थांबलेल्या गलबताला घेऊन आम्ही गाडीकडे निघालो... वाटेत आडव्या येणार्या ओढ्यात श्रमपरिहार करून भंडारदरा आणि रंधा फॉल बघण्यास निघालो... मात्र तेथे निराशच झाली...
मस्त वृत्तांत उतरतानाच्या
मस्त वृत्तांत
उतरतानाच्या निसरड्या वाटेचा अनुभव घेतलाय. काही वर्षांपुर्वी १०-१५ फुट घसरुन ढोपरावर पँट फाडून घेवून मातीने माखवून घेतल्यावर ट्रेकचं नावच घेत नाही मी 
वाटेत लागलेला पहिला
वाटेत लागलेला पहिला प्रवाह






माचीवरील कळसुबाईचे मन्दिर,
पहिली शिडी
दुसरी शिडी
तिसरी शिडी
माथ्यावरील कळसुबाई
सॉल्लीड
सॉल्लीड
मला बघुनच हुडहुडी भरली. ( आणि
मला बघुनच हुडहुडी भरली. ( आणि शिड्या बघुन धडकी ) . मला पावसाळी ट्रिपस् किवा ट्रेक भयंकर आवडतात. पण आता खरोखरंच दुरुन डोंगर साजरे असं झालय. (घसरायची भिती वाटते. :स्मित:)
मला तुमचा खुप आधिचा एक ट्रेक आठवला (बहुतेक रायगड?) हे वर्णन सुध्दा झकास .
धनु.
अहाहा! काय प्रसन्न हिरवा
अहाहा! काय प्रसन्न हिरवा रंग..!!
वृत्तांतही छान रे इंद्रा..
हो रायगडच आहे . पण अत्ता ते
हो रायगडच आहे . पण अत्ता ते फोटो दिसत नाहियेत. का रे?
धनु.
Pages