स्वाइन फ्लूचा उद्रेक होण्याच्या अगदी थोडेसे आधी आमची मेक्सिको ट्रिप पार पडली. आधी फक्त फोटो टाकण्याचा विचार होता, पण नुसते फोटो टाकण्यापेक्षा थोडीशी माहिती बरोबर टाकली तर जास्त मनोरंजक होइल असा विचार केला. आम्ही ह्या ट्रिपमध्ये कॅनकुन, चिचेन इत्झा आणि टुलुम अशी ३ ठिकाणे पाहिली. कॅनकुन सोडून इतर २ ठिकाणी आम्ही गायडेड टूर घेतली होती त्यामुळे त्या ठिकाणांबद्दल आणि त्या जागेच्या इतिहासबद्दल सविस्तर माहिती कळली. ती अगदी संक्षिप्त स्वरूपात इथे मायबोलीकरांकरता लिहितेय. मेक्सिकोचे लोक अतिशय मेहेनती आणि आगत्याशिल! तुमचे तिथले वास्तव्य चांगले व्हावे ह्यासाठी कष्ट घेतात. एकंदरीत तिथला अनुभव अतिशय सुंदर होता.
कॅनकुन -
अत्यंत निसर्गरम्य असे हे ठिकाण! लांबच्या लांब पसरलेला शुभ्र रेतीचा समुद्रकिनारा आणि निळे हिरवे (ज्याला इंग्रजीमध्ये turquoise color म्हणतात) पाणी असलेला समुद्र ही कॅनकुनची खासियत आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले कॅनकुन म्हणजे चिंचोळी पट्टी असलेला जमिनीचा भाग आहे ज्याच्या एका बाजुला समुद्रा आणि दुसर्या बाजूला लगून (मराठी शब्द माहिती नाही) आहे.
विमानातून दिसलेले कॅनकुन -
खाली आहे कॅनकुनचा मुख्य रस्ता. डाव्या बाजुला समुद्र, उजव्या बाजूला लगून आणि मध्ये हॉटेल्स -
कॅनकुनचा समुद्रकिनारा
चिचेन इत्झा -
चिचेन इत्झा हे ठिकाण मेक्सिकोच्या युकटन राज्यात आहे. चिचेन इत्झा हे मायन संस्कॄतीमधील एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. साधारण ६ चौरस मैल क्षेत्रफळाच्या भागात शेकडो लहान मोठ्या इमारती एके काळी उभ्या होत्या. त्यापैकी जवळपास ३० इमारतींचे अवशेष अजुनही अजुनही पहायला मिळतात.
चिचेन इत्झाला २ प्रकारची वास्तुशिल्प पाहायला मिळतात, मायन संस्कॄतीचा प्रभाव असलेली साधारण इसवीसनानंतर सातव्या ते दहाव्या शतकात बांधलेली आणि टोल्टेक संस्कॄतीचा प्रभाव असलेली साधारण इसवीसनानंतर दहाव्या ते तेराव्या शतकात बांधलेली.
चिचेन इत्झाची सर्वात लोकप्रिय इमारत म्हणजे एल कॅस्टिलो पिरॅमिड. ह्याला कुकुल्कानचे टेंपल म्हणूनही ओळखले जाते. कुकुल्कान, म्हणजे पंख असलेला साप, मायान संस्कॄतीत देव मानतात. हा पिरॅमिड खगोलशास्त्राच्या दॄष्टीनेही महत्वाचा होता. वर्षात २ दिवशी (स्प्रिंग आणि फॉल एक्विनॉक्स, अनुक्रमे २० मार्च आणि २२ सप्टेंबर) सुर्याचा विशिष्ट कोन आणि पिरॅमिडच्या ९ पायर्या ह्यांच्या सावलीमुळे एक भलामोठा साप पिरॅमिडवरून खाली येत आहे असा भास होतो. हा सोहोळा पहायला प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने लोक जमतात.
एल कॅस्टिलो पिरॅमिड -
फेदर्ड सर्पंट -
टेंपल ऑफ थाउजण्ड वॉरियर्स -
टुलुम -
टुलुम हे बर्यापैकी चांगले जतन केलेले मायन संस्कॄतीतले एक बंदर आहे. एका बाजूला करिबियन समुद्र आणि दुसर्या बाजूला उंच भिंत असलेले हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या सागरी किल्ल्यांची आठवण करुन देते. टुलुमचा किल्ला हा सागरी हल्ल्यांपासून बचाव करण्याकरता वापरला जायचा. स्पॅनिश लोक जेंव्हा ह्या भागात सागरी मार्गाने आले तेंव्हा त्यांना टुलुमचा शोध लागला.
टुलुमचा समुद्रकिनारा
२१ डिसेंबर २०१२ बद्दल सगळ्यांच्या मनात बरीच उत्सुकता असल्याने त्याबद्दलचे प्रश्न गाइड्सना लोकांकडून विचारले जायचे. मुख्य प्रश्न म्हणजे मायन कॅलेंडरप्रमाणे खरच जगाचा अंत २१ डिसेंबर २०१२ ह्या दिवशी होणार आहे का? ह्याचे उत्तर "फ्रॉम हॉर्सेस माउथ" ऐकण्याची सगळ्यांची इच्छा असायची. सगळ्या गाइड्सचे एकमेव उत्तर असायचे - नाही. बरेच तांत्रिक कारण त्यामागे ते सांगायचे पण मतितार्थ असा होता की मायन कॅलेंडर हे खूप तंत्रशुद्ध पण क्लिष्ट आहे. त्यामधले एक पर्व जे ५१२६ वर्षांचे आहे ते २१ डिसेंबर २०१२ ला संपणार आहे. पण तो कॅलेंडरचा शेवट, जसे लोक समजतात, नसून त्या पर्वाचा शेवट आहे. त्यानंतर नवीन पर्व सुरु होणार आहे.
वॉव ! पर्वणी! मेक्सिकोपर्व चे
वॉव ! पर्वणी! मेक्सिकोपर्व चे पारायण संपवलं आणि हा लेख आणि फोटो!
नुसतीच नजर टाकूनही खुष झालेय..!
मेक्सिकोपर्वात वाचलेला सर्व इतिहास समोर आला! कॅनकुनचे फोटो अतिशय सुंदर !
अकापुल्कोही सुंदर आहे म्हणे..
बाकी, फेदर्ड सर्पंट्सच्या शेजारी "चॅक" (पावसाचा देव.. ) पाय दुमडून पसरलाय..
प्लीज अजुन लिहा!
>>>
>>> विमानातून दिसलेले कॅनकुन -
बघत रहावा असा फोटो आहे.
फोटो मस्तच
फोटो मस्तच आणि माहिती पण
खुप छान
खुप छान फोटो.
कसले सही
कसले सही फोटोज आहेत!
फोटो छान
फोटो छान आले आहेत
सही माहीती
सही माहीती आणि फोटो... खासकरुन तो समुद्राचा फोटो!
सगळ्यांना
सगळ्यांना धन्यवाद!
फोटो छान
फोटो छान आहेत..
सुरेख आलेत
सुरेख आलेत सगळे फोटो. पहिला फोटो खूपच आवडला
फोटो छान
फोटो छान आहेतच. प्रवास वर्णन आणि तुमचे अनुभव अधिक विस्ताराने लिहले असते तर घर बसल्या आमची पण मेक्सिको ट्रीप झाली असती.
धन्यवाद
धन्यवाद लोकहो!
महागुरु, भाग्यश्री - जरा घाईतच लिहिला हा वॄत्तांत. पुढच्या वीकेंडला वेळ मिळाला तर नक्की जास्त लिहिन.
मो , मस्त
मो , मस्त फोटो अन वर्णनही छान .
खुप सुन्दर फोटो आहेत.
खुप सुन्दर फोटो आहेत. मेक्सिको फारच सुन्दर आहे. समुद्रचे पाणी एकदम नितल आणी शान्त! आम्ही ओक्टो १२ ला गेलो होतो. कॅनकुन, चिचेन इत्झा आणि टुलुम आनि कोबा पाहिले. मेक्सिकोला जानार असेल कोणी तर कोबा ही पहा. टुलुमचे बान्धकाम कोबा पासुन सुरु कर्न्यात आले होते १०० किमी बान्धकाम केले गेले
टुलुम पर्यन्त! कोबा आनी टुलुम साधारण १०० किमी आहे रोडने.
फोटो देता येत नाहीत्. (मजकूरात image किंवा link द्या....हे करुन पाहिले.)
....कुणी हेल्प करेल का?
मस्त लिहिलयं आणि फोटोज सुध्दा
मस्त लिहिलयं आणि फोटोज सुध्दा !
फोटो देता येत नाहीत्.
फोटो देता येत नाहीत्. (मजकूरात image किंवा link द्या....हे करुन पाहिले.)....कुणी हेल्प करेल का?>>>
इथे पहा... http://www.maayboli.com/node/1556
समुद्राचे फोटो सुरेख.
समुद्राचे फोटो सुरेख.
धन्यवाद महागुरु. मेक्सिको चे
धन्यवाद महागुरु. मेक्सिको चे काही फोटो...
टुलुम पनारोमिक
श्वेता२५ मस्त आहेत फोटो. तो
श्वेता२५ मस्त आहेत फोटो. तो वरून दुसरा पिरॅमिड कुठला आहे?
श्वेता२५.. फोटो मस्त आहेत.
श्वेता२५.. फोटो मस्त आहेत. आमचे कोबा राहुन गेले.
माझ्याकडे असलेले फोटो टाकतो.
वरील शेवटचा फोटो चिचन इट्सा
वरील शेवटचा फोटो चिचन इट्सा चा आहे. मला वाटतं टुलुम ला पिरॅमिड्स नाहित; गांव्/वस्तींचे अवशेष आहेत.
बाकि म्हणाल तर, कॅनकुन म्हणजे "मेक्सीको" नव्हे. ते मेक्सीकोतलं एक टुरिस्ट डेस्टीनेशन आहे; अगदी अमेरिकनायज्ड झालेलं. तिथलं मेक्सीकन फुडहि ऑथेंटीक नाहि.
कॅनकुन ला टॉप टुरिस्ट डेस्टीनेशन (हवाई नंतर) करण्याचं श्रेय मेक्सीको गव्हर्नमेंटला जातं. त्यांनी अक्षरशः अतिशय पैसा ओतुन हे बेट विकसीत केलं. फॉर देम इट्स अ मेजर रेव्हेन्यु स्ट्रीम; टुरिस्टना वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट देणं साहजीक आहे.
दोन वर्षांपूर्वी जाऊन आलो
दोन वर्षांपूर्वी जाऊन आलो कॅन्कुनला. रिसॉर्ट अप्रतिम होता पण एकूणातच जेवणाने पार निराशा केली. चिचन इट्झा वगैरेही सोसो आहे.
मो, मस्त फोटो. तुलुम चे बीच
मो, मस्त फोटो. तुलुम चे बीच सुंदर आहे. इतकी मउ वाळू कॅनकुन्च्या किनार्यावर पण नाही.
ज्यांना सलग दोन पेक्षा जास्त दिवस बीचवर पडिक राहणे जमत नाही त्यांना कॅनकून ला गेल्यास इस्ला मुहेरेस आणि एक्स कारेत ही दोन्ही ठिकाणे पण डे ट्रिप करण्यासारखी आहेत
कॅनकून एक्दम छान पण चिचेन
कॅनकून एक्दम छान पण चिचेन इत्झा मात्र अगदी been there done that category आहे.
शेवटचा फोटो चिचन इट्सा चा
शेवटचा फोटो चिचन इट्सा चा आहे. चुकुन टुलुम लिहले. वरुन २ फोटो कोबा चा आहे व १
सुध्दा.....कोबा ला त्या (१) पिर्यामिड वर चढता येते.
''तुलुम चे बीच सुंदर आहे. इतकी मउ वाळू कॅनकुन्च्या किनार्यावरपण नाही.''.... मेधा अगदी खर आहे. तुलुम बेस्ट १० बीच मधला १ आहे माझ्यासाठी! फ्लोरिदा, की वेस्ट पेक्श्या किती तरी सुन्दर!!
छान फोटो व माहिती.
छान फोटो व माहिती.